रस्त्यांवरील खड्ड्यांचे बळी

रस्त्यावरून जाताना काहीच चूक नसताना एखाद्या सरकारी खात्याच्या किंवा खासगी आस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे जायबंदी होण्याची वेळ आली तर तक्रार नोंदविणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे.

Story: अग्रलेख |
22nd June 2018, 06:38 am

 
पावसाळ्याचा जोर वाढला की रस्त्यांची परिस्थिती बिकट बनते.रस्त्यावरील खड्ड्यांतून वाट काढत जाताना विशेषत: दुचाकीस्वारांच्या आणिपादचाऱ्यांच्या नाकी नऊ येतात. चारचाकी वाहन चालकांचे एक बरे असते, गाडी खड्ड्यात गेली तरी आतील प्रवाशांचा जीव सुरक्षित राहतो.दुचाकीस्वारांना ती चैन मिळत नाही, स्कूटर किंवामोटरसायकल खड्ड्यात जाऊन पडण्याची वेळ आली तर कपाळमोक्ष होण्याची किंवा हात-पायमोडण्याची शक्यता असते. रस्त्याच्या बाजूने चालत जाणाऱ्यांची अवस्था तर पावसाळ्यातकीडा-मुंगीसमान होऊन जाते. रस्त्याच्या दुतर्फा निचरा न झालेले पाणी साचलेले असते.त्यातून वाट काढत चालत जायचे तर वेगाने येणारे गाडीचालक पादचाऱ्यांना पावसाच्याचिखलमिश्रीत पाण्याने सचैल भिजवून टाकतात. चांगले असलेले रस्ते पावसाळ्याआधी विविधकामांसाठी खणले जातात आणि काम झाल्यानंतर मातीचा भराव तसाच खड्ड्यात बेजबाबदारपणेटाकून कामगार निघून जातात. खणून अर्धवट बुजविलेले रस्ते मागाहून येणाऱ्यापावसामुळे पुन्हा उखडले जातात. त्यातून वाहने जाऊन तिथे मोठाले खड्डे तयार होतात.या खड्ड्यांत पाणी साचल्यानंतर दुचाकीस्वाराला खोलीचा अंदाज येत नाही. यामुळेपावसाळ्यात अनेक ठिकाणी अपघात होतात. या अपघातांत दुचाकीस्वार आणि त्याच्या मागेबसणारे जखमी होतात. अशा अपघातांची कुठेच नोंद होत नाही, अपघातग्रस्तचालक तक्रार करीत नाही. जखमी झाल्यास वैद्यकीय उपचार घेऊन घरी बसतात, पण रस्त्यावरून सुरक्षित जाण्याचा आपल्याला अधिकार आहे, ही बाब ध्यानात घेत नाही. 
काही दिवसांपूर्वी जुने गोवे येथे एक जोडपे दुचाकीवरून जातअसताना सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीकामासाठी रस्ता खणून ठेवलेल्याखड्ड्यात पडून जखमी झाले. लागलीच त्या जोडप्याने पोलिसांत तक्रार नोंदविली. म्हणूनपोलिसांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात निष्काळजीपणाचागुन्हा नोंदविला. रस्त्यावरून जाताना आपली काहीच चूक नसताना एखाद्या सरकारीखात्याच्या किंवा खासगी आस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे जायबंदी होण्याची वेळ आली तरतक्रार नोंदविणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. राजधानीच्या पणजी शहरासह राज्याच्यासर्वच भागांत कोठे ना कोठे कसली तरी विकासकामे चालू आहेत. दूरध्वनीची केबल,मोबाईल कंपन्यांच्या केबल घातल्या जात आहे. नळाची कनेक्शने,मलनि:स्सारणाच्या वाहिन्या घातल्या जात आहेत. गॅसची पाईपलाईन,रस्त्यांची दुरुस्ती हाती घेतली जात आहे. यातील प्रत्येक कारणासाठीआधी रस्ता खणला जातो. खणलेला रस्ता कधीही पूर्ववत बनविला जात नाही. राज्याच्यासर्व भागांतील रस्ते या कारणांमुळे धोकादायकरीत्या खड्डेमय बनले आहेत. शिवायरस्त्यांचे रुंदीकरण चालू आहे ते वेगळेच. पणजीतील खड्ड्यांमुळे असुरक्षितवाटणाऱ्या एका नागरिकाने आता पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. अशा जास्तीत जास्ततक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या तरच रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदारअसलेल्या अधिकाऱ्यांना जाग येईल. नाही तर रस्ते न खणण्याची घोषणा हवेत विरून जातेआणि नागरिकांचे हकनाक बळी जात राहतात ही परिस्थिती पालटणार कशी?