योगाला अपूर्व प्रतिसाद

Story: अग्रलेख-२ |
22nd June 2018, 06:38 am


केंद्रातील मोदी सरकारने आयुषहे स्वतंत्र खाते स्थापन करून योगासारख्या पुरातन व्यायाम प्रकाराला जेमहत्त्व प्राप्त करून दिले आहे, त्याचाच परिणाम म्हणूनजगाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचीसंकल्पना स्वीकारलेली दिसते. गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना या स्वतंत्र खात्याचाकार्यभार सोपवून आयुषचेमहत्त्व अधोरेखित केले आहे. या खात्यातर्फे योगावर भर देऊन तो विविध शालेय संस्थाआणि सामाजिक संघटनांमार्फत प्रत्येकापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारीसाजऱ्या झालेल्या योग दिनाच्या विशेष कार्यक्रमांना जगभरात मिळालेला प्रतिसादपाहाता सरकार या बाबतीत योग्य दिशेने जात असल्याचे दिसते. योगसाधना ही आपल्यादेशाला मिळालेली एक मौलिक देणगी आहे यात शंका नाही.अलीकडे देशातच नव्हे तर जगातयोगासनांबद्दल जागरूकता आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. साधुसंतांनी या विद्येचाजो प्रसार केला, ती योगासनाची विद्या मध्यंतरी अस्तंगतहोते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पद्मविभूषण बी.के.एस.अय्यंगरयांच्यासारख्या तपस्व्याने ही विद्या देशाच्या कानाकोपऱ्यांतच नव्हे, तर जगातील सर्व भागांत नेली. अलीकडे पंतजलीचे सर्वेसर्वा योगगुरूरामदेवबाबा आपल्या व्यवसायाचा विस्तार करीत असतानाच, दुसरीकडेयोगांचा अतिशय मन:पूर्वक प्रसार करताना दिसतात. निरोगी जीवनासाठी योग किती उपयुक्तआहे, हे ज्यावेळी लोकांना पटेल त्यावेळी औपचारिकदिनांचीही गरज राहाणार नाही !