एरंडाच्या पानांपासून औषधनिर्मिती

आयुर्वेदातही आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक धर्तीवर संशोधन सुरू झाले आहे. भारतात ठिकठिकाणी निघालेली आयुर्वेद महाविद्यालये आधुनिक तंत्रे आणि उपकरणांचा उपयोग करून पूर्वी दिलेल्या वापरात असलेल्या आैषधी वनस्पतींचा आधुनिक पद्धतींनी प्रयोग करून अधिक चांगली औषधे बनविण्याचे संशोधन करताना दिसतात.

Story: विज्ञान विहार | डॉ. प्रमोद पाठक |
22nd June 2018, 06:37 am

आयुर्वेद हा भारतीयांचा अतिप्राचीन वारसा आहे. अथर्ववेदात अनेकऔषधी वनस्पतींचे उल्लेख आणि उपयोग दिले आहेत. आयुर्वेदाचे मूळ अथर्ववेदात आहे. नंतरच्याहजारो वर्षांच्या काळात अथर्ववेदातील वनस्पती व्यतिरिक्त इतर शेकडो वनस्पतींचाअभ्यास त्यावेळच्या वैद्यांनी केला. त्यांच्या गुणधर्माचे संकलन केले. शरीरालाहोणाऱ्या व्याधी आणि त्यावर वनस्पतीजन्य औषधांच्या उपायांचा अभ्यास त्यांनी केला.तो अभ्यास अधिकाधिक उपयुक्त आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात पारंपरिकवैद्यांच्या किती पिढ्या गेल्यात याची आपल्याला कल्पना कशी येत नाही? आपल्याला चरक, सुश्रुत, वाक्भट इत्यादी महर्षिंची नावे आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ माहितीअसतात. आजच्या काळात ते ग्रंथ, त्यात दिलेली औषधे आणिऔषधे तयार करण्याच्या पद्धती प्रमाण मानल्या जातात. भारतात कितीतरी आयुर्वेदिकऔषधे बनविणाऱ्या कंपन्या आहेत. जसजसे आयुर्वेदाकडे लोक वळत आहेत तसतसे याकंपन्यांही आपली औषधे वाढवित आहेत. त्यात नव्या कंपन्यांची भर पडत आाहे. गेल्यादशकभरात बाबा रामदेव यांच्या पतंजली उत्पादनांनी आयुर्वेदिक औषध क्षेत्रात फारमोठी भरारी घेतली आहे.
औषधी तयार करण्याची साधने
पूर्वीच्या काळी म्हणजे हजारो वर्षांपासून तो अगदी शे दीडशे वर्षांपूर्वीपर्यंतआयुर्वे​दिक औैषधे छोट्या प्रमाणावर आणि घरगुती स्तरावर तयार केली जात असत.ठिकठिकाणचे वैद्य आपल्या घरीच ती तयार करून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना देत असत.गेल्या शतकापासून लोकसंख्या वाढली तसेच औषधी तयार करण्याचे नवे पाश्चात्य शास्त्रफार्मसी विकसित झाले. या शास्त्राने औद्योगिक यंत्रणे वापरून मोठ्या प्रमाणात औषधीनिर्माण करण्याचे तंत्रज्ञान तर निर्माण केलीच पण त्याचबरोबर त्यांची वेस्टनेघालून गोळ्या, द्रावण स्वरूपात विक्री करण्याचे तंत्रविकसित झाले.
पाश्चात्य उत्पादनाची साधने भारतात आल्यावर भारतीय वैद्यत्यापासून कसे दूर राहतील? त्यांनी काळाची गरज ओळखून नवीउत्पादन साधने वापरायला व मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायला सुरुवात केली.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी वैद्य अथवा डॉक्टरकडे गेल्यास तेऔषधांच्या पुड्या बांधून देत. आजकालचे वैद्य आणि डॉक्टर वेस्टनात चांगल्या रितीने मिळणाऱ्यागोळ्या व औषधे लिहून देतात. अॅलोपथीची लोकांना अधिक माहिती असते. तसेच आैषधीनिर्माण करणाऱ्या कंपन्यांत सतत नवी औषधे, नव्याव्याधींवरील उपाय शोधण्याचेही सर्वसामान्याला माहिती असते. पण आयुर्वेदामध्ये ज्यापद्धती हजारो वर्षांपूर्वीच निश्चित केल्या गेल्यात तर आता त्यात काय प्रगती करतायेणे शक्य आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो, त्याचे उत्तर असे आहे की, आयुर्वेदातही आतामोठ्या प्रमाणावर आधुनिक धर्तीवर संशोधन सुरू झाले आहे. भारतात ठिकठिकाणी निघालेलीआयुर्वेद महाविद्यालये आधुनिक तंत्रे आणि उपकरणांचा उपयोग करून पूर्वी दिलेल्यावापरात असलेल्या आैषधी वनस्पतींचा आधुनिक पद्धतींनी प्रयोग करून अधिक चांगली औषधेबनविण्याचे संशोधन करताना दिसतात. अशा एका अत्याधुनिक संशोधनाची माहिती खाली दिलीआहे.
एरंडाच्या पानांवर संशोधन
एरंडाचे झाड त्याच्या बियांपासून निघणारे तेल याची आपल्यालामाहिती असते. पूर्वी पोटात जंत झाल्यास अथवा पोटाच्या विकारावर एरंडाचे तेल वापरत असत.एरंडाचे जैवशास्त्रीय नाव Ricinus Communis Linn असे आहे.त्याचा उल्लेख अगदी वेदकाळापासून येतो. त्याचा उपयोग फार पूर्वीपासून सांधेदुखी,जखमांवर उपचार इत्यादीसाठी होत असे. त्या उपचारांमध्ये एरंडाच्यातेलाचाच प्रामुख्याने वापर होई. पण त्याच्या पानांचा आैषधी म्हणून वापर करता येईल कायअसा विचार आधुनिक वैद्यांना आला. त्यासाठी त्यांनी आता एरंडाच्या पानांवर संशोधनसुरु केले आहे. कारण आयुर्वेद औषधी संकलक ग्रंथात पानांच्या उपयोगांचा उल्लेखनाही.
एरंडाची पाने औषधी वनस्पती म्हणून वापरायची असतील तर त्यात औषधीगुण ज्ञात असणारी अशी कोणती संयुगे (Pharmaceutical companies) आहेत हे शोधून काढावे लागेल. त्यापासून औषधी द्रव्य वेगळे करण्यासाठीआजच्या औषध निर्मित पद्धतीला धरून प्रमाणित पद्धती प्रगत करावी लागेल, त्यादृष्टीने संशोधन सुरु झाले आहे. त्या संशोधनातील काही घटक खालीदिले आहेत.
एरंडाच्या प्रमाणित झाडांपासून पूर्ण वाढ झालेली पण हिरवी पानेगोळा करण्यात आली. त्यांना स्वच्छ धुवून साफ करून ती सावलीत वाळविण्यात आली. वाळल्यानंतरत्या पानांचा भुगा (पावडर) करण्यात आली. या पावडरपासून भविष्यात औषधे करण्याचेतंत्र विकसित केले जाईल.
भौतिक परीक्षण : या पानांच्या भुग्याचा थोडा भाग घेऊन त्याचे मायक्रोस्कोपखाली परीक्षण करून ते नोंदविण्यात आले. त्यासाठी प्रमाणित परीक्षण पद्धतीवापरण्यात आले.
रासायनिक परीक्षण : एरंडाच्या पानातील औषधी संयुगे वेगळेकरण्यासाठी त्याला काही द्रावणांनी धुतले गेले. साध्या पाण्यात न विरघळणारी संयुगेअशा द्रावणात विरघळतात व वेगळी काढता येतात. हायड्रोक्लो​रिक अॅसिड अॅ​सिटीक अॅसिड,अल्कोहोल, अॅसिटोन इत्यादी अनेक द्रव्येयासाठी वापरण्यात येऊन त्यात विरघळलेली संयुगे वेगळी करण्यात आली. अत्याधुनिकउपकरणांद्वारे वेगळ्या काढण्यात आलेल्या संयुगातील रसायनिक औषधी घटकांचे परीक्षणकरून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यावरून असे दिसले की, एरंडाच्या पानात फिनॉल, अल्क लॉईड आणिस्टेरॉईड(phenol, alka loids, steroids) संयुगे असतात. हीसर्व औषधे संयुगे आहेत हे पूर्वी सिद्ध झाले आहे. या संशोधनामुळे असे सिद्ध झालेकी, एरंडाच्या पानांपासूनही काही व्याधींवर उपचार करण्यासाठीऔषधे निर्माण करता येतील. औषधे निर्माण करणे सोपे नसले तरी आयुर्वेदिक नवी औषध कशीहोऊ शकतील हे लक्षात यावे पुढे जाऊन एरंडापासून काही औषधी बाजारात येतील.