केटामाईन प्रकरणातील चारही संशयितांना ट्रान्झिट रिमांड

आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड

14th June 2018, 01:47 Hrs

प्रसाद शेट काणकोणकर

गोवन वार्ता      

पणजी : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने  पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील विजय इंडस्ट्रीज या बंद आस्थापनावर, तसेच पर्रा-हडफडे येथील घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी पथकाने तिघा विदेशी नागरिकांसह एका पंजाबी युवकाला अटक केली; मात्र मुख्य सूत्रधार कळंगुट येथील हॉटेलातून पसार होण्यात यशस्वी झाला. अटक करण्यात आलेल्या संशयितांसाठी पथकाने पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेतला असून गुरुवारी सकाळी हे पथक संशयितांसह मुंबईत दाखल होणार आहे.      

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पथकाने जोनाथन थोर्न (४४), बॅरी जाॅन (६७) या दोघा ब्रिटिश नागरिकांसह व्हिएतनाम येथील न्युयन मॅन कुयोंग (३०) व पंजाब येथील सप्रित सिंग (४५) यांना अटक केली. मुख्य सूत्रधार जिमी सिंग हा अमलीपदार्थ व्यवहारात गुंतल्याची माहिती प्राप्त झाली होती. यात आंतरराष्ट्रीय टोळीचा समावेश असून गोव्यातून अमली पदार्थांची मुंबई तसेच विदेशांत तस्करी होत असल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यावरून गोव्यात अमलीपदार्थ तयार करण्याची प्रयोगशाळा कार्यरत असण्याचा संशयत पथकाला आला होता. केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या अधिका‌ऱ्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये १५ दिवस गोव्यातील ओद्योगिक वसाहत व किनारी भागात रैकी केली होती. परंतु त्यावेळी त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते.

गेल्या आठवड्यात पथकाने मुंबई येथील एका आस्थापनात छापा टाकल्यानंतर त्यांना गोव्यातील पिसुर्ले औद्योगिक वसाहतीची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने पिसुर्ले वसाहतीत शनिवारपासून पाळत ठेवली होती. सोमवारी त्यांना वसाहतीतील बंद असलेल्या विजय इंडस्ट्रीच्या शेडमध्ये संशयास्पद व्यवहार सुरू असल्याचे आढळून आले. पथकाने सोमवारी छापा टाकून सप्रित सिंग याच्यासह तिघा कामगारांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्या ठिकाणावरून पथकाने ५३ किलो केटामाईन जप्त केले. तसेच २०० लिटरचे पाच बॅरेल असे एकूण १००० लिटर आॅर्थोडिक्टोबॅनझायन, २५ लिटरचे ३४ छोटे कॅन अॅसेटोन, काही प्रमाणात मिथॅनोल आणि कोळसा असा कच्चा माल जप्त केला. पिसुर्ले वसाहतीतील प्रयोगशाळेत सप्रित सिंग याला मदत करणारा न्युयन मॅन कुयोंग याला कळंगुट येथील एका हाॅटेलमधून ताब्यात घेतले. मात्र यावेळी मुख्य सूत्रधार जिमी सिंग पसार झाला.

दरम्यान, केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने पर्रा-हडफडे येथील एका घरावर छापा टाकला आणि बॅरी जाॅन (६७) आणि जोनाथन थोर्न (४४) या ब्रिटिश नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. पथकाने त्या घरातून ७.५ किलो हशीष, ६०० ग्रॅम केटामाईन, १.५ किलो अफू हे अमलीपदार्थ जप्त केले. यावेळी आणखी ५ किलो माल जप्त करण्यात आला असून ते ड्रग्ज आहे का याची अद्याप चाचणी झालेली नाही.

Related news

भंगारअड्डे स्थलांतरण ६ वर्षांपासून शीतपेटीतच

आयडीसीला मिळेना जमीन; द. गो. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवले आयडीसी संचालकांकडे बोट Read more

राज्याचे हिवाळी अधिवेशन तीन दिवसांचेच निश्चित

३० जानेवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार Read more

कारवारजवळ बोट उलटून १५ भाविक समुद्रात बुडाले

उशिरापर्यंत सापडले ९ मृतदेह; ८ जण बचावले Read more

Top News

कारवारजवळ बोट उलटून १५ भाविक समुद्रात बुडाले

उशिरापर्यंत सापडले ९ मृतदेह; ८ जण बचावले Read more

भंगारअड्डे स्थलांतरण ६ वर्षांपासून शीतपेटीतच

आयडीसीला मिळेना जमीन; द. गो. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवले आयडीसी संचालकांकडे बोट Read more

राज्याचे हिवाळी अधिवेशन तीन दिवसांचेच निश्चित

३० जानेवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार Read more

होय ! मुक्तीपेक्षा जनमत कौलच श्रेष्ठ

काळे बावटे दाखवाच; मंत्री विजय सरदेसाई यांचे गोवा सुरक्षा मंचाला आव्हान Read more

सत्तरीतून दर्जेदार साहित्याची निर्मिती

शिवाजी देसाई : गोमंतक मराठी भाषा परिषदेची साहित्यिक सहल Read more