मुख्यमंत्री अखेर आज गोव्यात

मंत्रिमंडळाची उद्या बैठक; प्रलंबित विषयांबाबत निर्णय शक्य

14th June 2018, 01:46 Hrs

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी : तीन महिन्यांच्या उपचारानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारी मध्यरात्रीच्या विमानाने अमेरिकेतून भारतात यायला निघतील. गुरुवारी दुपारी २ वाजता ते मुंबई विमानतळावर उतरतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते गोव्यात पोहोचतील. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.            

स्वादुपिंडाच्या गंभीर आजारामुळे पर्रीकर ८ मार्चपासून न्यूयॉर्कमधील इस्पितळात उपचार घेत होते. तीन महिन्यांच्या उपचाराची फेरी पूर्ण करून ते बुधवारी गोव्यात येण्यासाठी निघाले. भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास ते न्यूयॉर्कमधून विमानाने निघतील. १४ जून रोजी सायंकाळपर्यंत ते गोव्यात पोहोचतील.            

१४ फेब्रुवारी रोजी पोटदुखीचा त्रास जाणवल्यामुळे पर्रीकर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा १५ फेब्रुवारीला गोमेकॉत गेल्यानंतर ते पुढील उपचारासाठी मुंबईत लिलावती इस्पितळात दाखल झाले. तिथल्या उपचारानंतर २२ फेब्रुवारी रोजी ते गोव्यात परतले. त्याच दिवशी विधानसभेत त्यांनी अर्थसंकल्प सादर केला व काही महिन्यांसाठी लेखानुदानही मंजूर करून घेतले.                         

त्यानंतर काही दिवस गोव्यात विश्रांती घेऊन ते पुन्हा मुंबईला उपचारासाठी गेले. तिथून ७ मार्चला न्यूयॉर्कला रवाना झाले. जाण्यापूर्वी गोव्यात कामकाज पाहण्यासाठी त्यांनी सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई आणि फ्रान्सिस डिसोझा या तीन मंत्र्यांची मंत्रिमंडळ सल्लागार समिती स्थापन केली होती. त्या समितीने आतापर्यंत ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची कामे मंजूर केली आहेत. शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत विधानसभा अधिवेशन घेण्याविषयी चर्चा होऊ शकते. गेले काही महिने महत्त्वाचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले होते, त्यामुळे त्यांतील काही प्रस्ताव शुक्रवारच्या बैठकीत मंजुरीसाठी येतील.            बैठकीत मडकईकरांच्या खात्यांविषयी निर्णय शक्य

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे ते गंभीर स्थितीत सध्या मुंबईत उपचार घेत आहेत. त्यांच्याकडील वीज व समाज कल्याण खात्याचा कारभार पाहण्यासाठी ती जबाबदारी तत्काळ दुसऱ्या एखाद्या मंत्र्यांकडे देण्याविषयी शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मडकईकर यांच्या अनुपस्थितीत वीज खात्याचे काम प्रचंड वाढले आहे. त्यामुळे या खात्याचे काम पाहण्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली जाऊ शकते.

Related news

भंगारअड्डे स्थलांतरण ६ वर्षांपासून शीतपेटीतच

आयडीसीला मिळेना जमीन; द. गो. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवले आयडीसी संचालकांकडे बोट Read more

राज्याचे हिवाळी अधिवेशन तीन दिवसांचेच निश्चित

३० जानेवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार Read more

कारवारजवळ बोट उलटून १५ भाविक समुद्रात बुडाले

उशिरापर्यंत सापडले ९ मृतदेह; ८ जण बचावले Read more

Top News

कारवारजवळ बोट उलटून १५ भाविक समुद्रात बुडाले

उशिरापर्यंत सापडले ९ मृतदेह; ८ जण बचावले Read more

भंगारअड्डे स्थलांतरण ६ वर्षांपासून शीतपेटीतच

आयडीसीला मिळेना जमीन; द. गो. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवले आयडीसी संचालकांकडे बोट Read more

राज्याचे हिवाळी अधिवेशन तीन दिवसांचेच निश्चित

३० जानेवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार Read more

होय ! मुक्तीपेक्षा जनमत कौलच श्रेष्ठ

काळे बावटे दाखवाच; मंत्री विजय सरदेसाई यांचे गोवा सुरक्षा मंचाला आव्हान Read more

सत्तरीतून दर्जेदार साहित्याची निर्मिती

शिवाजी देसाई : गोमंतक मराठी भाषा परिषदेची साहित्यिक सहल Read more