तिसरा मांडवी पूल : स्वप्नपूर्ती दृष्टिक्षेपात

कोणती समस्या केव्हा निर्माण होईल हे आधी सांगता येत नाही. शिवाय प्रकल्पाच्या मंजुरीसाठी तो लवकरात लवकर कसा पूर्ण होईल हे सांगावे लागत असते. ह्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर सप्टेंबर २०१८ मध्ये त्याचे लोकार्पण झाले तर तो बांधणाऱ्या लार्सन टुब्रो कंपनीचे अभिनंदनच करावे लागेल. त्यादृष्टीने ८५ टक्के काम पूर्ण होणे हा यशाचा एक टप्पाच ठरतो.

Story: अक्षांश रेखांश लक्ष्मण जोशी | 14th June 2018, 06:28 Hrs

गोव्यातील मांडवी नदीवर बांधण्यात येत असलेल्या तिसऱ्या पुलाचे८५ टक्के काम पूर्ण झाल्याने देशातील आगळ्यावेगळ्या पुलाच्या गोमंतकीयांच्या स्वप्नपूर्तीचाक्षण दृष्टिक्षेपात आला असे म्हणावे लागेल. मंगळवारी या पुलाच्या अखेरच्यामहत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक टप्पा पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय मार्ग परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला समारंभ त्याचाच संकेत आहे.आता या पुलाचे संपूर्ण बांधकाम सप्टेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होइंल हे निश्चित मानायला हरकत नसावी.गोमंतकीयांचे सुदैव म्हणजे त्या वेळी गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरहेही त्यांच्यामध्ये उपस्थित असतील. हे खरे आहे की, यापुलाच्या पूर्णतेचे वेळापत्रक आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलावे लागले. खरे तरदुसऱ्या वेळापत्रकानुसार हा पूल एप्रिल किंवा मे २०१८ मध्येच पूर्ण व्हायला हवा होता.पण वस्तुस्थिती अशी आहे की, आपल्याकडे एखाददुसरा प्रकल्पचनियोजित वेळात पूर्ण होतो. तरीही नितीन गडकरी यांच्या कामाचा झपाटाच असा आहे की,प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यासाठी ते यंत्रणेच्यामागे हात धुवून लागतात व तिला अक्षरश: पळवतात. त्यांचे हे प्रयत्न स्तुत्य असलेतरी सुमारे १५०० कोटींच्या या प्रकल्पाचे कामही तेवढ्याच जिकिरीचे होते. एक तर हापूल केबल स्टेड तंत्राने बांधावयाचा आहे. त्याचे बरेच काम मांडवीच्या अथांगपात्राशी संघर्ष करुन करायचे आहे. ते करताना विद्यमान दोन पुलांवरील वाहतूकविस्कळीत होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. मांडवीच्या एका पुलाने दगादिल्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून काळजीपूर्वक कामही करायचे आहे. शिवाय एवढ्यामोठ्या प्रकल्पाचे साहित्य जुळविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. त्यावरबांधकाम करणाऱ्या यंत्रणेचे नियंत्रण असतेच असे नाही. शिवाय साहित्याच्यावाहतुकीचाही प्रश्न असतो. अजस्त्र यंत्रसामुग्री दूरदूरुन आणावी लागते. याबांधकामाचे बरेच साहित्य प्रथम धारगळपर्यंत आणून ते पर्वरीपर्यंत आणावे लागले.राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार नाही याची काळजीही घ्यावी लागतहोती. अर्थात त्याचाही हिशेब करुनच वेळापत्रक निश्चित केले जाते. पण दरम्यान अचानककाही समस्या निर्माण होतात. त्या हिशेबात घेतलेल्या नसतात. कारण कोणती समस्याकेव्हा निर्माण होईल हे आधी सांगता येत नाही. शिवाय प्रकल्पाच्या मंजुरीसाठी तोलवकरात लवकर कसा पूर्ण होईल हे सांगावे लागत असते. ह्या सगळ्या बाबी लक्षातघेतल्या तर सप्टेंबर २०१८ मध्ये त्याचे लोकार्पण झाले तर तो बांधणाऱ्या लार्सनटूब्रो कंपनीचे अभिनंदनच करावे लागेल. त्यादृष्टीने ८५ टक्के काम पूर्ण होणे हायशाचा एक टप्पाच ठरतो.
वास्तविक मांडवी नदीवर हल्लीच दोन पूल आहेत. पूर्वी तर एकच पूलहोता व तो अकस्मात पडल्याने लोकांचे किती हाल झाले हे कदाचित नव्या पिढीला ठाऊक नसेलपण तो दाहक अनुभव घेणारे अनेक गोमंतकीय आजही हयात आहे. त्यानंतर दुसरा पूल तयारझाला. पण १७ व्या क्रमांकाच्या या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकच एवढी आहे की,ते दोन पूलही कमी पडू लागले. म्हणून पर्रीकर सरकारने तिसऱ्या पुलाचेहे शिवधनुष्य हाती घेतले. सप्टेंबरपर्यंत जर त्याचा टणत्कार होऊ लागला तर केवळगोमंतकीयांनाच नव्हे तर देशवासियांना त्याचा लाभ घेता येणार आहे.पहिल्या दोनपुलांसाठी वापरण्यात आलेले तंत्र व या पुलासाठी वापरले जाणारे तंत्र यात खूप फरकआहे. या तंत्राने (केबलस्टेड) तयार करण्यात आलेले काही पूल गोव्यात आहेत. पण तेलहान आहेत. मात्र मांडवी आणि झुवारी या दोन नद्यांवर पूल बांधायचे म्हणजे तेतंत्रज्ञ आणि सरकार यांच्यासाठी एक आव्हानच आहे.
खरे तर पर्रीकर सरकारला हा मांडवीवरील तिसरा पूल राज्याच्याखर्चानेच बांधायचा होता. पण खाण प्रश्न व अन्य काही समस्या निर्माण झाल्या.त्यामुळे राज्य सरकारला केंद्र सरकारकडे मदत मागावी लागली आणि केंद्रानेही तत्परतेने५०० कोटींची मदत दिली. त्यामुळे पुलाचे काम इथवर पोचू शकले. निधी आणि साधनसामुग्रीयाबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे नियमन ही देखील या प्रकल्पासाठी एकसमस्याच होती. कारण पर्वरीमधील पुंडलिकनगरपासून तर पणजीतील कदंब बसस्टँडपर्यतच्याक्षेत्रात हे काम पसरले आहे. मुख्य पुलाच्या बांधकामाबरोबरच वळण मार्गांचेही कामकरायचे होते आणि हे सर्व मांडवीच्या अथांग पात्राची मर्जी सांभाळून करायचे होते.या कामात अपघातांमध्ये आतापर्यंत किती बळी गेले याची माहिती माझ्याकडे नाही पण अशाकामांबद्दलचा माझा जो अनुभव आहे त्यावरुन मी असे म्हणू शकतो की, अशा कामांवर सामान्यत: एक कोटीच्या कामामागे एक बळी असे ते प्रमाणअसते. ज्येष्ठ अभियंत्याकडूनच मला ही माहिती मिळाली. तेवढी हानी इथे झाली असेल अशीमला आशा आहे. हे काम किती जिकिरीचे असते हेच मला यातून सुचवायचे आहे.
प्रकल्प सुरु असताना अनेक समस्या निर्माण होतात. वेळप्रसंगी लोकक्षोभालाहीतोंड द्यावे लागते. ते सगळे लक्षात घेता या प्रकल्पाचे आतापर्यत झालेले कामअभिनंदनीयच ठरते. ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे ही सदिच्छा. मांडवीवरील हा तिसरापूल हल्लीच्या दोन पुलांच्या मध्ये तयार होत असून तो त्या पुलांपेक्षा किती तरीउंच आहे. ६०० मीटर लांबीचा हा पूल एकीकडे मेरशीला स्पर्श करेल तर दुसरीकडेपुंडलिकनगराला स्पर्श करेल. मार्गात त्याची नजर पर्वरीमधील विधान सभागृहाकडेहीवळेल. केवळ पणजी किंवा पर्वरी या शहरांचाच नव्हे तर गोव्याचा भूगोल बदलविण्याची यातिसऱ्या पुलाची क्षमता आहे. यावरुन त्याचे महत्त्व अधोरेखित होते.

Related news

आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर

आशेवर माणूस जगतो हे खरे असले तरी ठराविक मर्यादेनंतरही कृती घडून प्रश्न सुटत नाही असे दिसले तर संतापलेला माणूस होत्याचे नव्हते करू शकतो हे सत्ताधाऱ्यांनी विसरता कामा नये. Read more

बालसंगोपन आणि कथा-गोष्टीचं महत्त्व

पौराणिक एेतिहासिक घटना अाणि अापल्या अायुष्यात घडणाऱ्या घटना मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यास सहाय्यभूत ठरतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची अाहे. याची जाणीव पालकांनी ठेवली पाहिजे. Read more

सत्तेचा सोस आणि कमकुवत भाजपा

भाजपला मगोच्या तीन आमदारांशिवाय सत्ता टिकवणे कठीण होणार आहे. त्यामुळे मगो आणि भाजप यांच्यात खरोखरच मतभेद आहेत की हे सगळे ब्लॅकमेलिंगचे राजकारण आहे किंवा २०१७ सारखे दोन्ही पक्षांतील नेत्यांनी रचलेले हे नाटक आहे हे येत्या काही दिवसांत कळेल. Read more

Top News

कारवारजवळ बोट उलटून १५ भाविक समुद्रात बुडाले

उशिरापर्यंत सापडले ९ मृतदेह; ८ जण बचावले Read more

भंगारअड्डे स्थलांतरण ६ वर्षांपासून शीतपेटीतच

आयडीसीला मिळेना जमीन; द. गो. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवले आयडीसी संचालकांकडे बोट Read more

राज्याचे हिवाळी अधिवेशन तीन दिवसांचेच निश्चित

३० जानेवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार Read more

होय ! मुक्तीपेक्षा जनमत कौलच श्रेष्ठ

काळे बावटे दाखवाच; मंत्री विजय सरदेसाई यांचे गोवा सुरक्षा मंचाला आव्हान Read more

सत्तरीतून दर्जेदार साहित्याची निर्मिती

शिवाजी देसाई : गोमंतक मराठी भाषा परिषदेची साहित्यिक सहल Read more