शांततेच्या अध्यायाची संधी

योगायोगाने एकाच वेळी राष्ट्रप्रमुख बनलेले ट्रम्प आणि किम उशिरा का होईना, चर्चेच्या टेबलवर आले. जागतिक शांततेचा नवा अध्याय लिहिण्याची संधी आता त्यांना आहे.


14th June 2018, 06:26 am

जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत ढकलण्यासाठी निघालेल्या दोनकथित बलाढ्य नेत्यांनी अचानक यू-टर्न मारून जागतिक शांततेच्या पायाभरणीचा प्रकल्पहाती घ्यावा हे आधुनिक जगाच्या राजकारणातील एक आश्चर्य ठरावे. अमेरिकेचे अध्यक्षडोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जोंग उन यांनी हे अघटितमंगळवारी प्रत्यक्षात आणून दाखविले. या पुढाकारामुळे दोन्ही नेते जगाच्याउत्सुकतेचा विषय बनत अनेकांच्या प्रशंसेला पात्र ठरले आहेत. अर्थात ट्रम्प आणि किमया दोन नेत्यांची सिंगापूरमध्ये पार पडलेली शिखर परिषद ही केवळ सुरुवात असूनयापुढील एकत्रित वाटचालीत अधिक महत्वाचे आणि कठीण टप्पे अडथळे बनून येणार अाहेत.या अडथळ्यांवर मात करून दोन्ही नेते पुढील मार्ग कसा काढतात यावर शांततापूर्ण जगाचीसमीकरणे अवलंबून आहेत. गेल्या वर्षभरात ट्रम्प आणि किम यांनी आपल्या ताकदीचाअतिगर्व बाळगत एकमेकांना कमी लेखणारी अनेक विधाने केली. जगाच्या नकाशावरून उत्तरकोरिया पुसून टाकायला आपल्याला वेळ लागणार नाही अशी धमकी ट्रम्प यांनी किम जोंग उनयांना दिली होती. तर, अमेरिका नष्ट करण्यासाठी लावण्यातआलेल्या अण्वस्त्रांची कळ आपल्या टेबलवर असून ती एका क्षणात आपण दाबू शकतो असाइशारा किम यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला होता. दोन्ही नेत्यांचा स्वभावविक्षिप्त म्हणून प्रसिद्ध, दोघांचाही कधी कोणावर विश्वासबसेल आणि कधी कोणावरील विश्वास उडेल हे सांगता येत नाही. दोघेही आतापर्यंत सुखासीनआयुष्य जगले आहेत. बहुधा त्यामुळेच कोणत्याही प्रश्नावर ठाम भूमिका घेण्यासाठीदोघेही नेते प्रसिद्ध नाहीत, उलट घेतलेली भूमिका अचानक बदलूनदुसऱ्या बाजूला जाण्यातही त्यांचा हात धरणारा दुसरा राष्ट्रप्रमुख नसेल!
ट्रम्प आणि किम यांच्या भेटीतून पुढील सहकार्याची मालिका उभीराहिली तर शांततावादी जग खरोखरच नि:श्वास सोडेल. वयाच्या तिशीत असलेले तरुण राष्ट्रप्रमुखकिम आणि ७२ वर्षे वयाचे अमेरिकेचे आजवरचे सर्वाधिक वयस्कर अध्यक्ष ट्रम्प यांच्यातपिढ्यांचा फरक असला तरी त्यांच्यात वर नमूद केलेली काही साम्यस्थळेही आहेत.त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वांत विरोधाभासही आहे. एक व्यावसायिक असलेलेट्रम्प जगाच्या ध्यानीमनी नसताना हिलरी क्लिंटन यांना पराभूत करीत अमेरिकेच्याअध्यक्षपदी बसले. याआधी ट्रम्प तसेच त्यांच्या आधीच्या पिढीतील कोणीही सक्रियराजकारणात उतरले नव्हते. तिकडे किम यांची राजकारणातील ही तिसरी पिढी. त्यांच्याआजाेबांनी उत्तर कोरियाला अण्वस्त्रसज्ज बनविण्याची प्रक्रिया सुरू केली होती,ती किम यांनी पुढे नेली. कोणालाही न जुमानता धमकावणीची भाषा करीतप्रचलित व्यवस्थेला शिंगांवर घेण्याचे राजकारण ट्रम्प अाणि किम यांनी आधी करूनबघितले. आधीच्या राजवटीतील अमेरिकेने पुढाकार घेऊन युरोपीय देशांकडे केलेल्या नाटोकरारातून बाहेर पडण्याची तयारी ट्रम्प यांनी सुरू केली. महत्वाच्या जागतिककरारांचा आदर न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. या ट्रम्पगिरीमुळे अमेरिका आपल्या पारंपरिकमित्रराष्ट्रांपासून दूर जाऊ लागली, त्यांच्या साहसवादी राजकारणालादेशांतर्गत विरोध होऊ लागला. तिकडे, उत्तर कोरिया अण्वस्त्रांच्याकार्यक्रमामुळे जगात एकाकी पडू लागला. अण्वस्त्र कार्यक्रम आणि दडपशाहीमुळे देशातीलगरिबी आणि असंतोष वाढू लागला. शीतयुद्धाच्या काळात सोविएत युनियन उत्तर कोरियाच्याबाजूने ठामपणे असायचा, परंतु सोविएतचे विभाजन अनेकराष्ट्रांत झाल्यापासून उत्तर कोरियाला चीन वगळता जागतिक राजकारणात खात्रीचा मित्रराहिला नाही. या घटनाक्रमांमुळे एकमेकांना ललकारून तणाव वाढविण्यापेक्षा एकत्रितयेऊन शांतता राखण्यावर भर देण्यात दोन्ही देशांचे हित आहे याची जाणीव ट्रम्प आणिकिम यांना झाली. त्याचे फलित म्हणजे मंगळवारची शिखर परिषद!
आधुनिक काळात शस्त्रसज्जता वाढवून, अण्वस्त्रेबनवून आणि इतर देशांना धमकावून किंवा निर्बंध लादून कोणताही देश पूर्णपणे सक्षमहोऊ शकत नाही. उलट शांततापूर्ण मार्गाने, इतर देशांशीमैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करून जागतिक राजकारणात महासत्ता बनता येते.संरक्षणावरील तरतूद कमी करून पायाभूत सुविधा, शिक्षण,आरोग्य आदी मूलभूत विषयांवर खर्च वाढविला तर देशाची सर्वांगीणप्रगती होते. या मूलभूत विचारांचा विसर पडलेले सत्ताधारी साहसवादी राजकारण करूइच्छितात, जे फार काळ टिकत नाही. योगायोगाने एकाच वेळीराष्ट्रप्रमुख बनलेले ट्रम्प आणि किम उशिरा का होईना, चर्चेच्याटेबलवर आले. जागतिक शांततेचा नवा अध्याय लिहिण्याची संधी आता त्यांना आहे.