आपल्या शिक्षणातून ‘शिकायचे’ असेल तर...

कारखान्यात निर्जीव यंत्रांसोबत काम करणारा कामगार आणि चैतन्याने भरलेला, भारावलेला, ऊर्जा ओसंडून वाहणारा जिज्ञासू विद्यार्थी ज्या समोर मोठ्या उत्साहाने अनेक अपेक्षा बाळगून वावरतो तो शिक्षक या दोहोंतला फरक क्षणोक्षणी, पावलोपावली दिसायला हवा.

Story: शिक्षण देता-घेता नारायण भास्कर देसाई |
13th June 2018, 07:10 am

शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपल्या आणि शेजारच्या राज्यात जूनमहिन्यात होते, असे मानले जाते. केंद्रीय माध्यमिक शिक्षणमंडळाशी संलग्न बहुतेक शाळांचे वर्ष मात्र एप्रिल महिन्यातच सुरू होते. महिनाभरवर्ग भरतात. त्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी असते. आपल्याकडील शाळा सुरु व्हायच्याआसपास शैक्षणिक बाबींवर काही चर्चा जाहीररीत्या होत नाही. काही प्राथमिक शाळांच्याइमारतींच्या दुरवस्थेबाबत बातम्या येणे हीच एक त्यातल्या त्यात ओळखीची, सवयीची बाब. काही शाळांतून शिक्षकांची उणीव, दोनवा तीन सरकारी हायस्कूलसाठी एकच मुख्याध्यापक आदी प्रकार कधीतरी वाचायला मिळतात.या सोडून प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन वा विद्यार्थ्यांच्यादृष्टीने काळानुरूप बदलायच्या पद्धतींबाबत चर्चा होत नाही, हाच अनुभव आहे. म्हणजे साधनसुविधा, सुरक्षा,मनुष्यबळ व्यवस्थापन यांचा विचार अगदी गंभीर परिस्थिती आल्यावर होतो,तो सुद्धा सगळीकडे नाही.

असे का? शिक्षणात शाळेसाठी हवेशीर,सुसज्ज, इमारत, पुरेशी जागा या मुलभूत आवश्यकता आहेतच. अध्यापन आणि प्रशासन या बाबीहीमहत्त्वाच्याच, पण यांच्या पलीकडे आपले लक्षच जात नसेल तरशिक्षणाच्या नावाने नक्की काय चाललेय ते कळायला काहीच मार्ग नाही. गोव्यात उच्चमाध्यमिक स्तरापर्यंत शैक्षणिक सुविधांचा भार, शासन घेत.अगदी शाळांच्या इमारतींचे भाडे पण सरकार चालक संस्थेला देते. शिक्षक आणि कर्मचारीवर्गाचा पगार, भत्ते, सर्व सेवा सुविधाहे तर आहेच. एवढे सारे सरकारी खर्चाने चालवल्यावर, दैनंदिनशैक्षणिक व्यवहारांबाबत, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया,अभ्यासक्रमातील उद्दिष्टे, सामाजिक-सांस्कृतिकवातावरण निर्मिती, शिक्षण प्रक्रियेतील सामाजिक सहभाग,कार्य-कौशल्यांचा विचार आणि यांच्या सुयोग्य संयोगातून एक जागरुक,जबाबदार नागरिक घडवण्यासाठी संस्था चालक, कर्मचारी आणि स्थानिक समाज यांना खरे तर वेळ आणि संधी मिळणे सोपे आहे.पण या अंगाने गावोगावच्या स्थानिकांसाठी, स्थानिकसहभागातून स्थानिक संस्थांच्या नियंत्रणाखाली असलेल्या किती शाळा विचार वा कृतीकरतात यावर सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. शिक्षणावरील खर्च ही जर भविष्यातीलगुंतवणूक मानली, तर तिच्या आधारे चालणारे व्यवहार नियमित तपासण्याचीगरज ओघाने आलीच. त्यातही शिक्षण हा मुलभूत हक्क म्हणून मान्य केल्याचे हे दहावेवर्ष! शिक्षण हक्क कायद्याने नि:शुल्क आणि सर्वांना सक्तीचे केलेले शिक्षण कितीमौल्यवान आहे, हे कळणे महत्त्वाचे. उज्ज्वल भवितव्याचेसाधन म्हणू्न जर शिक्षणाचा विचार करायचा तर याविषयी अन्य क्षेत्रांतील लोकांचीमतेही विचारात घ्यावी लागतील. अॅपलकंपनी संगणक, संपर्क क्षेत्रातील एक अग्रगण्यनांव. या कंपनीच्या सहसंस्थापकाने अलीकडे भारतीय शिक्षणासंबंधी काही परखड विधानेकेली. त्याच्या मते भारतीय शिक्षण नवविचार, अभिनवतायांच्यासाठी पोषक नाही. शिक्षण पूर्ण करून समाजात आपले योगदान देण्यासाठीलागणाऱ्या किमान क्षमता, कौशल्ये देण्यात हे शिक्षण कुचकामीआहे. या त्यांच्या विधानांवर कुठे तरी चर्चा झाली असलीच, तरीत्याचे सोयरसुतक फारसे कुणाला नसल्यासारखेच सर्व काही चालू आहे. सामाजिक माध्यमांतूनया विधानांच्या अनुषंगाने तथाकथित प्रेरक, मार्गदर्शक व्यावसायिकवक्त्यांनी आकर्षक मांडणी करून शैक्षणिक परिवर्तनाची गरज सर्वांपर्यंत पोचवण्याचाप्रयत्न केला.
भारतीय समाजाचे जबाबदार घटक आणि जाणकार म्हणून त्यांनी केलेलेलिश्लेषण असे : अमेरिकन विद्यार्थ्याला शिकता शिकताच बागकाम, यंत्र, दुरुस्ती, साहसीउपक्रम वा कपडे धुणे अशा काही ना काही क्षमता प्राप्त होतात. भारतीय विद्यार्थ्यालामात्र यातले काहीच येत नाही, कारण त्याच्यासाठी पालक राबतात,त्याला सर्व सुविधा हाताशी मिळाव्यात असा प्रयत्न करतात आणि दुसरीकडेशाळा त्याला प्रयोगाच्या, स्वत: करत, चुकून, निरीक्षण करून, सुधारून, इतरांना विचारून शिकण्याच्या संधीनाकारते. परिणामी बहुतांश विद्यार्थी निष्क्रिय, नि:सत्वबनतात.
मुलांना विचार करता येतो, त्यांनाकल्पना सुचतात. त्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयोग आणि प्रयत्नकरण्याची संधी घरी, शाळेत, समाजातमिळणे गरजेचे असते. त्या दृष्टीने शिक्षणसंस्थांतून पोषक वातावरण, ते तयार करणारे कल्पक आणि कृतिशील मनुष्यबळ, त्यालाप्रयोगाच्या, नवीन काही शिकण्याच्या संधी यांची आवश्यकताअसते. हे व्हायचे तर संस्थाचालक, व्यवस्थापन यांच्याकडेहीती दृष्टी आणि इच्छा हवी. त्याचबरोबर उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन, नियंत्रण या बाबीत नियमित लक्ष हवे. आपल्या शाळातून शिक्षक नेमल्यानंतरत्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवाव्यात याबाबतची स्पष्टता गोव्याच्या स्थानिकशैक्षणिक पर्यावरणात अभावानेच आढळते. शासकीय स्तरावर सेवांतर्गतप्रशिक्षणाबाबतच्या तरतुदी धोरणात आहेत, पण त्यासाठी कृतीवा योजना नगण्यच. केवळ पुस्तके आणि परीक्षा यात अडकलेल्या शिक्षणाच्या चाकोरीतूनपदव्या घेतलेलेच शिक्षक बनतात, त्यामुळे कृती, अनुभव, कामाविषयी आस्था, सृजनशील वृत्ती, सृजनांनंदाची ओढ या बाबतीतही चित्रआशादायक नाही. कारखान्यात निर्जीव यंत्रांसोबत काम करणारा कामगार आणि चैतन्यानेभरलेला, भारावलेला, ऊर्जा ओसंडूनवाहणारा जिज्ञासू विद्यार्थी ज्यासमोर मोठ्या उत्साहाने अनेक अपेक्षा बाळगूनवावरतो तो शिक्षक या दोहोतला फरक क्षणोक्षणी, पावलोपावलीदिसायला हवा. नव्या शिक्षण विचारांनुसार शिकणाराच फक्त विद्यार्थी नव्हे तरशिक्षकही विद्यार्थी असतो. हे शिक्षकाचे शिकणे शिक्षणव्यवस्थेला जास्त उपयुक्त,जास्त उपकारक आणि जास्त उपयोजक बनवण्यासाठी अत्यावश्यक नव्हे,तर अनिवार्य आहे.
मागे नॅस्कॉम या संस्थेने भारतातील जेमतेम २५टक्के पदवीधरच नोकरीवा काम देण्यायोग्य असल्याचे म्हटले होते. इन्फोसिसचे नारायणमूर्ती अमेरिकेतील माहितीतंत्रज्ञान उद्योगाचा हवाला देऊन म्हणाले होते की, आपल्याकडीलजेमतेम १५ टक्केच अभियांत्रिकी पदवीधर काम देण्यायोग्य असतात. काही​ जाणकारांचेम्हणणे आपल्याकडे दरवर्षी पन्नास लाखांच्या वर तरुण पदवी घेतात. त्यातलेअर्ध्यापेक्षा जास्त कामाला ठेवण्यायोग्य नसतात.
काम करण्याची इच्छा, आवड, ऊर्जा ज्या वयात प्रचंड असते, त्या वयात मुलांनाबसवून ठेवून. सगळे आयते देण्यातून पालक, शिक्षकसंस्थाचालक, शासक प्रशासक उद्याचे राष्ट्र कसे घडवणार?​ब्रिटिशांना हवे असलेले कारकून बनवणारे शिक्षण स्वतंत्र भारतातजोमात चालते. त्याचे मूळ शाळातील शिक्षणात आहे. त्याचा दोष, जे ज्ञानदानकरण्याचादावा करतात ​‘पिढ्या घडविण्याचीभाषा करतात, त्यांच्याइतकाच त्यांना त्यांच्याउत्तरदायित्वाची, बांधिलकीची, व्यावसायिकनिष्ठेची, नैतिकतेची किमान जाणीवही करून न देणाऱ्या सर्वांचाचआहे. हे समजून घेतानाच एकविसाव्या शतकाची दोन दशके खर्ची पडली आहेत. एकविसावे शतकभारताचे आहे, असे उच्चारवाने म्हणणे आणि ते खरे करण्यासाठीकृती करणे, यातील फरक सर्वांनीच समजून घेण्याची गरज आहेआणि त्यानुसार पुढील कृती शाळा आणि शिक्षक या स्तरावर होण्याची तर त्याहून जास्तआहे. सुज्ञांस अधिक काय सांगावे!

------

निरंतर आणि जीवनभर शिकण्याची दृष्टी, जाणीवआणि तयारी शिक्षकांमध्ये निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण सेवांतर्गत प्रशिक्षण आणित्या आधारे शिक्षकाचे सेवा मूल्यांकन या बाबी महत्त्वाच्या ठरतात. औद्योगिक आस्थापनांमध्येकर्मचारी निवड होऊन त्यांना प्रत्यक्ष काम सुरु करण्याआधी प्रशिक्षण देण्यावर खर्चकेला जातो आणि नंतरच्या काळातही त्या क्षेत्रात टिकायचा प्रयत्न करणारे कर्मचारीपदरमोड करून स्वत:च्या ज्ञानाचे, कौशल्यांचे अद्ययावतीकरणकरत राहतात, वा अन्य क्षेत्रात जाण्यासाठी आवश्यक तयारीकरतात. अशा सर्व क्षेत्रांसाठी मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी ज्या शालेयशिक्षणाची आहे, तिथे मात्र या बाबतीत शुकशुकाट दिसतो. मगदेशोदेशीचे उद्योजक आपल्या शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढतात, त्यांचा काय दोष?