पर्यटकांचा जातो जीव...

कायदे पाळण्याबाबत बेफिकीरी आणि स्थानिक लोकांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या पर्यटकांना चाप लावण्यासाठी कायदा-सुव्यवस्था यंत्रणा अधिक सक्षम बनविली पाहिजे


13th June 2018, 07:01 am

गोव्यात येऊन समुद्रकिनाऱ्यावर नजाता राहणारे देशी पर्यटक क्वचितच आढळतील. देशाच्या कोणत्याही भागांत जाऊन बघितलेतर लोकांच्या मनात गोव्याबद्दल फार मोठे आकर्षण असल्याचे आढळून येते.गोव्याबद्दलच्या आकर्षणात निसर्गसुंदर आणि विस्तृत समुद्रकिनाऱ्यांचा सर्वांत मोठावाटा आहे. अर्थात स्वस्त मिळणारे मद्य हेही एक आकर्षण असते. आता या आकर्षणात कॅसिनोंचीभर पडली आहे. कॅसिनो आणि मदिरेबरोबर मदिराक्षींची उपलब्धता गेल्या काही वर्षांतसहजसाध्य बनल्यामुळे तर गोवा अधिकच लोकप्रियहोऊ लागला आहे. पैसे उधळण्याची तयारीठेवून येथे येणाऱ्या साहसवादी पर्यटकांना एकाच खेपेत कॅसिनोंच्या साक्षीने मदिराआणि मदिराक्षी मिळू लागल्यामुळे गोव्याचे पर्यटन एका वेगळ्याचउंचीवरपोहोचले. असे हे पर्यटन करण्यासाठी तरुण-तरुणींचेतांडेच्या तांडे गोव्यात येऊन धडकत असतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वेगानेविस्तार होऊ लागला तशी दुप्पट-तिप्पट वेगाने अर्थसमृद्धी आयटीप्रशिक्षितयुवक-युवतींच्या घरात सेवा करू लागली. पैसा फेकताच गोव्यात हवे असलेले सारे काहीमिळते, तेही समुद्राच्या फेसाळत्या लाटांच्या साक्षीने.त्यामुळे या आकर्षणाला सारीच युवा पिढी बळी पडू लागली. आयटीतज्ज्ञ असोत किंवा अनपढकामगार, किनारपट्टीपासून दूरवर राहिलेल्या लोकांनासमुद्राची विशेष माहिती नसते, असते ते समुद्राचे कमालीचेआकर्षण, ठाऊक असतात त्या मित्रांकडून ऐकलेल्यागोव्याबद्दलच्या खऱ्या-खोट्या कथा. अशाच कथा ऐकून जिवाचा गोवा करण्यासाठी आलेल्याचौदा युवकांच्या गटातील पाच जणांना कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी प्राण गमवावेलागले.

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातून आलेल्या या गटातील सारेच तरुणबहुधा गोव्यात प्रथमच येत होते. समुद्रकिनाऱ्याचे दर्शनही त्यांना प्रथमच घडले असावे.दूरवरून मोहक दिसणाऱ्या सागराच्या लाटांबरोबर खेळता आले नाही तर त्याच लाटाआपल्याला सागराच्या उदरात गडप करून टाकतात, या लाटा फेसाळदिसत असल्या तरी त्यांची ताकद प्रचंड असते, याची सुतरामकल्पना त्यांना नव्हती. तरी नशीब की पाचच जण लाटांच्या तडाख्यात बुडाले, इतर नऊ जणांचे नशीब बलवत्तर होते, म्हणूनत्यांचा जीव बचावला. या पाच मृत्यूंना ना सरकारी यंत्रणेला जबाबदार धरता येणार,ना किनाऱ्यांवर तैनात करण्यात आलेल्या दृष्टी या संस्थेच्याजीवरक्षकांना. पर्यटकांनी समुद्रात उतरू नये असा इशारा पावसाळ्याच्या सुरुवातीलाचदिला जातो, तसा देण्यात आला होता. किनाऱ्यावर लाल बावटेलावण्यात आले होते. सकाळी सहा वाजता जीवरक्षकांच्या ड्युटीची वेळच मुळात सुरू झालीनव्हती, म्हणून तिथे एकही जीवरक्षक नव्हता. असता तरी यायुवकांनी त्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिले नसतेच. त्यामुळे हे तरुण पर्यटक आपल्यापावलांनी मरणाच्या दारात गेले, घरच्या आप्तांना दु:खाच्यासागरात बुडवून आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांची जगभरात बदनामी करून! अशा उतावीळपर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारी यंत्रणा किंवा खासगी संस्था आणखी कोणते बरे उपाययोजू शकेल हाही मोठा प्रश्नच आहे. आता राज्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर, बसस्थानकांवर आणि विमातळावरही याबाबत धोक्याचे इशारे देणारे मोठाले फलकलावावे लागतील. किंवा समुद्रात बुडून मरण पावणाऱ्यांच्या छायाचित्रांसह पोस्टरतयार करून ते समुद्रकिनाऱ्यांवर उभारावे लागतील. गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फेऑनलाईन मोहीम चालवून संभाव्य दुर्घटना टाळण्यावर लक्ष केंद्रीत करता येण्यासारखेआहे. अशा उपायांतून जरी पर्यटक धडा घेतील तर भविष्यात काही जणांचे जीव वाचू शकतील.
पर्यटन व्यवसाय सध्या गोव्यातील महसूल आणि रोजगार मिळवून देणारेएकमेव हमखास क्षेत्र आहे. पर्यटनाच्या प्रसारात राज्याच्या अर्थव्यवस्थेचे हित आहे.परंतु एक तर केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते पर्यटन मर्यादित ठेवून चालणार नाही. दुसरेम्हणजे पर्यटनाचा विविध अंगांनी विकास करण्यात आला पाहिजे. मोठा खर्र्च न करणारेजास्त पर्यटक गोव्यात येणे म्हणजे पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण. कायदेपाळण्याबाबत बेफिकीरी आणि स्थानिक लोकांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या पर्यटकांनाचाप लावण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा अधिक सक्षम बनविणे, आवश्यकेनुसार थेट कारवाईसाठी ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्यसंस्थांना अधिकार देणे अशा उपाययोजना होणे आता गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी,समुद्रकिनाऱ्यांवर खुलेआम मद्यविक्री आणि मद्यपान चालते, ते बंद झाल्याशिवाय मद्यपी पर्यटकांच्या माकडचेष्टांपासून गोवा मुक्तहोणार नाही. पर्यटकांचा जीव गेल्यानंतर त्यांच्या आप्तांना दु:ख होतेच, त्याचबरोबर गोव्याची बदनामीही होते. हे प्रकार आता थांबलेच पाहिजेत.