सत्ताधारी गटांच्या सावध हाचलाची

सध्याच्या भाजप आघाडी सरकारमध्ये असलेले सर्वच घटक पक्ष व अपक्ष सावध झाले आहेत. रातोरात घडामोडी होऊन आपण सत्तेतून बाहेर राहणार नाही ना, याची सध्या चिंता बऱ्याच नेत्यांना सतावत आहे. त्यामुळे ‘मी पुढे की तू पुढे’ अशी अंतर्गत स्पर्धा सध्या या नेत्यांमध्ये सुरू झाली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले आमदारही सत्ताबदल झाल्यास आपले काय होईल, या चिंतेत आहेत.

Story: दृष्टिक्षेप | पांडुरंग गावकर |
25th May 2018, 07:00 pm

उपचारासाठी अमेरिकेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जूनच्यातिसऱ्या आठवड्यात गोव्यात पोहोचतील. त्यानंतर गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन होईल.ज्यात अर्थसंकल्प मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. पर्रीकर गोव्यात आल्यानंतरते सरकारची धुरा दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे देऊन काही दिवस विश्रांती घेतील,अशीही शक्यता वर्तवली जात आहे. पण, यासाऱ्या गोष्टी पर्रीकर परत आल्यानंतर ते कोणता निर्णय घेतात, त्यावर अवलंबून आहे. दुसऱ्या बाजूने कर्नाटकमध्ये भाजपची झालेलीनाचक्की आणि सेक्युलर जनता दलाच्या सहाय्याने सत्ता स्थापन केल्यामुळे काँग्रेसला आलेलेबळ यातून गोव्यातही सत्तापालट होण्याची शक्यता काही राजकीयपंडितांकडून वर्तवली जात आहे.

मुळात कर्नाटकातील निवडणुकीनंतर गोव्यात सत्ता स्थापन करा,असे स्पष्ट निर्देश यापूर्वीच काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दिलेहोते. त्यामुळे आता गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेण्याच्याप्रयत्नात आहे. काँग्रेसच्या गळाला कोण लागेल, याचा काहीनेम नाही. पण, सध्याच्या भाजप आघाडी सरकारमध्ये असलेलेसर्वच घटक पक्ष व अपक्ष सावध झाले आहेत. रातोरात घडामोडी होऊन आपण सत्तेतून बाहेरराहणार नाही ना, याची सध्या चिंता बऱ्याच नेत्यांना सतावतआहे. त्यामुळे मी पुढे की तू पुढेअशी अंतर्गत स्पर्धा सध्या या नेत्यांमध्ये सुरू झाली आहे. काँग्रेससोडून भाजपमध्ये आलेले आमदारही सत्ता बदल झाल्यास आपले काय होईल, या चिंतेत आहेत.
भाजपला सहकाऱ्यांचाच त्रास
पर्रीकरांच्या अनुपस्थितीमुळे सत्तेतील भाजप सध्या संथगतीनेमार्गक्रमण करत आहे. तर काँग्रेस सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत आहे. या पक्षांना२०१९ मध्ये लोकसभेसह गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होतील, असे वाटत असल्यामुळे एका बाजूने पक्ष मजबूत करण्याचेही काम त्यांनीसुरू केले आहे. भाजप सरकारमध्ये राहून भाजपचे आमदार- मंत्री असलेल्या मतदारसंघातघुसखोरी करण्याचे काम घटक पक्ष करत असल्यामुळे भाजपमध्येही चलबिचल आहे. विरोधात असलेल्याकाँग्रेसनेही भाजपच्याच मतदारसंघांवर डोळा ठेवत, तिथेमागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना आपल्याकडे आणण्यास प्रयत्नांचीशिकस्त चालविली आहे. पण भाजपला काँग्रेसपेक्षा सहकारी पक्षच सध्या त्रास देत आहेत.भाजपसाठी यापेक्षा विचित्र व दुर्दैवी असे काही नाही. ज्यांना घेऊन सत्ता स्थापनकेली, तेच लोक आता भाजपच्या मतदारसंघामध्ये घुसत असूनभाजपसाठी हे धक्कादायक आहे.
भाजप सध्या अशा अनेक धक्क्यांमधून जात आहे. त्यांना सध्या कोणबरे आणि कोण वाईट, तेच शोधणे मुश्कील झाले आहे. पर्रीकरविदेशात व सतीश धोंड यांची महाराष्ट्रात बदली, यामुळेगोव्यातील भाजपची घडी विस्कटत आहे, हेही इथे नमूद करणेगरजेचे आहे. यावर काहीजण कितीही आव आणून बोलत असले तरी सत्यस्थिती ही शेवटी सत्यस्थितीच राहणार ! सत्ताधारी गटातचअंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस काही प्रमाणात निश्चिंत आहे, यात नवल नाही.
वातावरण निर्मितीचे काम
सत्ताधारी गटात आलेली मरगळ हेरून सध्या राज्यात आपल्यासमर्थनासाठी वातावरण निर्मिती करण्याचे कामही काँग्रेसने जोरात सुरू केले आहे. कर्नाटकातभाजपला सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठीराज्यपालांची भेट घेऊन काँग्रेसने बरीच फुटेजखाल्ली. पेट्रोल दरवाढीमुळे घोडागाडी आणून केलेले नाटक (नाटक याचसाठीकी, लोकांना तुम्ही घोडागाडीचा पर्याय देत असाल तर तीसुविधा गोव्यात नाही!), ‘नमन गोंयकारासारखा उपक्रम राबवून प्रसारमाध्यमांचे व लोकांचे लक्ष वेधून घेण्याचेप्रयत्न काँग्रेस करत आहे. मुळात काही दम नसलेले असे उपक्रम करूनही काँग्रेसस्वत:ला जिवंत ठेवत आहे, हे विशेष. त्यांच्या या प्रयत्नांमुळेभाजप गोंधळली आहे.
काँग्रेसच्या कार्यक्रमांची दखल घेऊन त्यांची टिंगल करण्यासाठीभाजपचेपडेल नेतेपत्रकारपरिषदा घेतात, त्यावरून भाजप काँग्रेसच्या अशा उपक्रमांनाआतून घाबरली आहे, हे स्पष्ट दिसते. यातून एक मात्र निश्चितआहे की, काँग्रेसचे उपक्रम जरी पोरकट वाटले तरी येत्यालोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी हे पुरेसे आहेत. अशा प्रकारचे उपक्रमकरण्याची वेळ यापूर्वी काँग्रेसवर आली नव्हती. जे पूर्वी भाजप करायची ते आताकाँग्रेस करत आहे. याचे फळ काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळू शकते.
मगो, फाॅरवर्ड सावध
सत्ता स्थापन करण्यासाठी अशा उपक्रमांपेक्षा डावपेचांची गरज असतेआणि एका बाजूने लोकांचे लक्ष वेधण्याचे कार्यक्रम करून दुसऱ्या बाजूने काँग्रेसचेकाही नेते सत्तेचे डावपेच खेळण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या डावपेचाची चाहूललागल्यामुळे मगो व गोवा फॉरवर्ड हे दोन्ही पक्ष व काही अपक्ष सध्या बऱ्यापैकी सावधझाले आहेत. सर्वांनी काँग्रेस आपल्याशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही, असे दावे करणे सुरू केले आहे. याचा अर्थ काँग्रेस सोबत जाण्यासाठी हेनेते एका पायावर तयार आहेत, असाच होतो. त्यामुळे सत्तापरिवर्तन झाल्यास भाजपसोबत आता सत्तेत असलेले कोण काँग्रेससोबत असतील व कोणाचामुख्यमंत्रिपदावर डोळा आहे, ते येत्या काही दिवसांत दिसूनयेईल.
भाजप जी पद्धत इतर राज्यांमध्ये वापरत आहे, तेच आता काँग्रेस गोव्यात करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रसंगी मुख्यमंत्रीघटक पक्षाला देऊन सत्ता मिळवणे, असे मिशनच काँग्रेसनेउघडले आहे. या सत्तेच्या सामन्यात काँग्रेसचा विजय होण्यासाठी सत्ताधारी गटातीलकोण सर्वात आधी त्यांच्या गळाला लागतो, फक्त एवढाच मुद्दासध्या आहे.