फेसबुकला आता वेध ई-कॉमर्स व्यवसायाचे !

Story: माध्यम मानस |
25th May 2018, 07:00 pm

ई- कॉमर्स व्यवसायात नवनव्या कंपन्या आपले नशिब आजमावत आहेत.त्यामुळे यामध्ये आता आणखी फेसबुकची भर पडणार आहे. सध्या या क्षेत्रात अमेझॉन,फ्लिपकार्ट, ईबे, मिंत्रा अशा कंपन्याचा दबदबा आहे. त्याचबरोबर युजरसाठी ही ठिकाणेनेहमीची खरेदी ठिकाणे बनली आहेत. फेसबुक या कंपन्यांशी कसा सामना करणार याबाबतउत्सुकता असणे स्वाभाविकच आहे. फेसबुक या क्षेत्रात आक्रमक प्रवेश करेल, असे जाणकारांचे मत आहे. कारण आताच सोशल मीडियावर फेसबुकची ही संकल्पनायुजर्सना प्रचंड आवडली असल्याचे संकेत मिळत आहेत. फेसबुक त्याच्या ई-कॉमर्स साईटचेसध्या टेस्टिंग करत असल्याचे घोषित केले आहे. मेसेंजर आणि ई-पेमेंट या दोन नव्यासुविधा युजर्सना सवयीच्या झाल्यानंतर आता जगप्रसिद्ध सोशल नेटवर्क साईट फेसबुक आताई-कॉमर्स व्यवसायात प्रवेश करत आहे. फेसबुकची ही स्वतःची साईट पुढच्या महिन्यातम्हणजे जूनमध्ये सुरू होत असल्याची घोषणा नुकतीच केली. त्यामुळे बाजारात अगोदरच याक्षेत्रात असलेल्या अन्य ई-कॉमर्स कंपन्यांसमोर फेसबुकचे आव्हान पेलण्याचे संकटउभे ठाकले आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया क्षेत्रातील नामवंत कंपनी फेसबुक ब्लॉकचेनबनवून स्वतःची क्रिप्टो करन्सी बनविण्याच्या तयारीत असल्याचे एका वेबसाईटने म्हटलेआहे. फेसबुक बिटकॉइनप्रमाणे स्वतःचे आभासी चलन तयार करण्याबाबत गंभीर्याने विचारकरीत असल्याचे संकेत मिळत आहेत. फेसबुकचे आज जगात दोन अब्ज युजर आहेत. त्यामुळे यानिर्णयाचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. फेसबुक आभासी चलनाच्या माध्यमातून पेमेंटसुविधा देणार असल्याचे बोलले जाते. फेसबुक ई-कॉमर्स व्यवसायात फेसबुक उतरणारअसल्याने हे दोन्ही निर्णय एकमेकाला पुरक आहेत. या दोन्ही घटना सोशल मीडियासाठीसकारात्मक असल्या तरी तिसरी मात्र फारशी दिलासादायक म्हणता येणार नाही. सोशलमीडियावरील मध्यमवयीन व्यक्तींमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त फेसबुक किंवा ट्विटर यांसारख्यासोशल नेटवर्कवर जास्त वेळ घालवणाऱ्या तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण फारसे आढळतनाही, तर मध्यमवयीन व्यक्तींमध्ये मात्र नैराश्याचे प्रमाणजास्त असते, असा निष्कर्ष एका ताज्या संशोधनातून उघड झालाआहे. वय वर्षे ३० ते ४९ या गटातील व्यक्ती सोशल मीडियावर अधिक काळ राहिल्याने त्यामानसिक आजाराला जास्त बळी पडतात, तर ५० वर्षे पूर्णकेलेल्या व्यक्तींची मानसिक अवस्थाही चांगली नसते. मात्र, इन्स्टाग्राम व स्नॅपचॅट यांसारख्या सेवांचा वापर करणाऱ्या १८ ते २९वर्षांच्या लोकांमध्ये चिंता किंवा नैराश्याची लक्षणे आढळत नाहीत. वयाची ३० वर्षेपूर्ण केलेल्या व्यक्ती आपले आयुष्य योग्य प्रकारे चालू आहे की नाही, याची चिंता करतात आणि आपल्या समवयीन लोकांच्या आयुष्याशी तुलना करतात,असे या पाहणीत आढळले.