वेगळ्या राजकीय व्यवस्थेकडे वाटचाल

पर्रीकर उपचारासाठी परदेशात असताना पर्यायी नेतृत्वाची चाचपणी सुरू झाली आहे. नेमक्या त्या वेळेस सरदेसाईंनी वेगळा सूर लावला, हे नवीन राजकीय व्यवस्था निर्माण करण्याच्या इच्छेतूनच घडले आहे.

Story: अग्रलेख |
25th May 2018, 06:01 am

कर्नाटकातील सरकार स्थापनेचे नाटक शुक्रवारच्या विश्वास मतानंतर सध्यापुरतेतरी पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राज्य विधानसभेतमांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेसच्या आमदारांनीअपेक्षेप्रमाणे मतदान केल्यामुळे सरकारचे बहुमत सिद्ध झाले. आता सरकार स्थापनेचाअंक संपून सरकार चालविण्याच्या दीर्घ अंकाला सुरुवात झाली आहे. हे सरकार पाच वर्षेटिकणे अपेक्षित असले तरी काँग्रेसने कुमारस्वामींना पाच वर्षांच्या पाठिंब्याचेवचन दिलेले नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचेकर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर यांनी भविष्यातील घडामाेडींचे सूतोवाचकेले आहे. अद्याप तिथे मंत्रिमंडळाची रचना व्हावयाची आहे. तिथूनच सरकारचालविण्याच्या नाटकात रंग भरू लागतील. नाही तरी आघाडी सरकार घडविणे एक वेळ सोपेअसते, परंतु ते चालविणे किती कठीण असते याचा अनुभव घेऊनमोठमोठे राजकीय नेते मेटाकुटीला आले आहेत. खुद्द कुमारस्वामींचे वडील एच. डी.देवेगौडा यांना १९९६ मध्ये ध्यानीमनी नसताना केंद्रातील आघाडी सरकारचे पंतप्रधानपदभूषविण्याची संधी मिळाली होती. ते आघाडी सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर तसेचमर्जीवरही अवलंबून होते. अकराव्या महिन्यातच काँग्रेसने देवेगौडा यांची उचलबांगडी करूनआपल्याला अधिक सोयीचे असलेले इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधानपदी आणावयाससत्ताधारी आघाडीला भाग पडले आणि गुजराल यांनाही वर्षाच्या आतच पायउतार होण्यास भागपाडले. त्याच काँग्रेसच्या पाठिंब्यावर देवेगौडांचे पुत्र कुमारस्वामीकर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदी बसले आहेत!

कर्नाटकात सरकार चालविण्याच्या नाटकाला मोठ्या आवेशात सुरुवातझाली आहे. भाजपला पराभूत करावयाचे असेल तर सर्वांनी एकत्रित लढा द्यावा लागेल,या वास्तवाची जाणीव काँग्रेससह सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिकपक्षांना झाल्यामुळे त्यांची एकत्र येण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या प्रक्रियेचीप्रतिक्रिया इतर राज्यांबरोबरच गोव्यातही उमटू लागली आहे. आणखी किती काळ भाजपबरोबरफरफटत जात राहायचे, असा प्रश्न गोवा फॉरवर्डचे नेते आणिमंत्री विजय सरदेसाई यांच्या मनात अलिकडच्या काळात पिंगा घालत होताच. गुरुवारीत्यांनी या अस्वस्थतेला वाट करून दिली. त्यासाठी त्यांना खाणबंदीच्या विषयाचेनिमित्त चांगले सापडले. राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने ताबडतोबवटहुकूम काढला नाही तर भाजपला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करण्याचा इशारासरदेसाई यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र सावईकरांना पुन्हा निवडूनआणण्यासाठी विशेषत: मडगाव व फातोर्डा भागात भाजपला गोवा फॉरवर्डची मदत लागेल. हीमदत गृहीत न धरण्याचा त्यांचा इशारा म्हणजेच प्रसंगी भाजपची साथ सोडण्याची तयारीअसाच त्याचा अर्थ होतो. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीयसमीकरणे बनत असतील तर कोणत्याही पर्यायांसाठी गोवा फॉरवर्ड तयार असेल हेच सरदेसाईयांनी भाजपला दिलेल्या इशाऱ्यातून सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईलतसतसे देशातील राजकारण तापू लागेल, गोवाही त्याला अपवादनसेल. राजकीय वातावरण गरम करण्याची सुरुवात विजय सरदेसाई यांनी केली आहे. केंद्रातसंरक्षणमंत्री असलेले मनोहर पर्रीकर गोव्यात मुख्यमंत्री म्हणून यावेत या अटीवरसरदेसाई, मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि अपक्ष रोहन खंवटेयांनी सरकारात सहभागी व्हावयाचे ठरविले. आता पर्रीकर आजारामुळे उपचारासाठी परदेशातअसताना भाजपमध्ये पर्यायी नेतृत्वाची चाचपणी सुरू झाली आहे. नेमक्या त्या वेळेससरदेसाई यांनी वेगळा सूर लावला, हे नवीन राजकीय व्यवस्थानिर्माण करण्याच्या इच्छेतूनच घडले आहे.
पर्रीकर जरी पुढील महिन्यात गोव्यात परतले तरी ते पूर्ण क्षमतेनेमुख्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळू शकतील का, याबाबतसाशंकता आहे. म्हणून भाजपच्या धुरिणांनी पर्यायी नेतृत्वाकडे मुख्यमंत्रिपदाचाताबा देण्याचा विचार चालविला आहे. या जबाबदारीसाठी भाजपमध्ये सक्षम नेतृत्व नाही,गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंवर भाजपचा विश्वास नाही. अशापरिस्थितीत मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर यांच्याकडे नेतेपदासाठी चांगला पर्याय म्हणूनभाजपचे श्रेष्ठी बघत आहेत. ही बाब सरदेसाई यांना अस्वस्थ करत असावी. पर्रीकर येथे नसल्यामुळेआधीच अस्वस्थ बनलेल्या सरदेसाईंची अस्वस्थता सुदिन ढवळीकर मुख्यमंत्री बनले तरअधिकच वाढेल. देशभरात जर भाजपच्या विरोधात व्यासपीठ तयार होत असेल तर त्याचा भागबनण्याची त्यांची इच्छा या अस्वस्थतेतून आलेली असू शकेल.