...तर गोवा फॉरवर्ड वेगळ्या विचाराच्या तयारीत

विजय सरदेसाईंकडून भाजपला सांकेतिक इशारा


24th May 2018, 02:58 pm
...तर गोवा फॉरवर्ड वेगळ्या विचाराच्या तयारीत

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्याआदेशानुसार बंद पडलेल्या खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी वटहकूम हाच पर्यायआहे. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने त्वरित पावले उचलली नाहीत तर लोकसभानिवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याबाबत गोवा फॉरवर्डला विचार करावा लागेल, असा इशारामंत्री विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

२०१७च्या राज्य विधानसभा निवडणुकीतमये मतदारसंघातून काँग्रेसउमेदवार म्हणून निवडणूक लढविलेले संतोष सावंत यांनी गुरुवारी सरदेसाई यांच्याउपस्थितीत गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. खाणींचा जर लिलाव झाला तर स्थानिकांना न्यायमिळेल का हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीराज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय तत्काळ सुरू करावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

हेही वाचा