साखळीचे नगराध्यक्ष सगलानीच

उपनगराध्यक्षपदी कुंदा माडकर यांची निवड


24th May 2018, 02:35 pm

साखळीपालिकेच्या नगराध्यक्षपदी पुन्हा एकदा धर्मेश सगलानी यांची निवड झाली आहे. तर,उपनगराध्यक्षपदाची माळ कुंदा माडकर यांच्या गळ्यात पडली आहे. गुरुवारी झालेल्याबैठकीत दोघांची बहुमताने निवड करण्यात आली.

साखळी पालिकेत१३ पैकी १० जागांवर विजय मिळवणाऱ्या काँग्रेस समर्थक गटातर्फे सगलानी यांचेच नावनगराध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. गुरुवारी झालेल्या मतदानावेळी त्यांना एका भाजपनगरसेवकाच्या मतासह ११ जणांचा पाठिंबा मिळाला. तर, माडकर यांना १० नगरसेवकांचापाठिंबा मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे व आरोग्यमंत्रीविश्वजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली साखळीचा विकास करण्यास कटिबद्ध असल्याचेयावेळी सगलानी यांनी सांगितले. 

हेही वाचा