मराठी लेखक आहात का?


21st May 2018, 11:52 am
मराठी लेखक आहात का?


तुम्ही मराठी लेखक आहात का? मराठी भाषेतील उत्तम साहित्य तुम्ही वाचले आहे का? तुम्हाला मराठी साहित्याशी सबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल...तर तुमच्यासाठी प्रतिलिपीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे. ‘प्रतिलिपी’ हे भारतीय भाषांमधील साहित्य स्व-प्रकाशित करण्याचे सगळ्यात मोठे व्यासपीठ म्हणून काम करते. सध्या ‘प्रतिलिपी’ १०,००० हून अधिक लेखक आणि दर महिन्याला २० लाखांपेक्षा जास्त वाचकवर्ग आठ भाषांमध्ये कार्यरत आहे.
सध्या मराठी साहित्यासाठी काम करण्यासाठी उत्सुक असलेल्या युवावर्गासाठी नोकरी उपलब्ध आहे.
नोकरीचे स्वरूप आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे. इच्छुक व्यक्तींनी आपले resume [email protected] वर मेल करावेत.
पद : Author Engagement Manager (मराठी भाषा तज्ञ), प्रकार : पूर्णवेळ नोकरी, स्थळ : बंगळुरू, कर्नाटक, वेतन : मुलाखतीनुसार ठरवले जाईल, वयाची मर्यादा : कमाल ३० वर्षे.
पात्रता निकष : १. मराठी साहित्य, लेखक, पुस्तके आणि व्याकरणासंबंधीचे उत्तम ज्ञान. मराठीतील उत्तम लेखकांची नावे माहीत असावीत आणि त्यांचे साहित्य वाचलेले असावे. २. उत्तम लेखनशैली. सर्जनशील लेख लिहिता आले पाहिजेत. ३. मराठी आणि इंग्रजी भाषेत उत्तम संवाद साधता येणे. (लिखित आणि शाब्दिक स्वरुपात), ४. MS office, Mail writing, FB Pages administration आणि संगणक इत्यादीचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
५. उत्तम वक्ता असणे गरजेचे आहे तसेच कार्यक्रम आयोजनाचा अनुभव असणे. ६. तुम्ही जर लेखक, ब्लॉगर, कवी किंवा content लेखक असाल तर आपले हे काम अनुभव म्हणून गृहीत धरले जाईल. ७. मार्केटिंग आणि व्यवस्थापन कौशल्य असावे तसेच ग्राहककेंद्रित मानसिकता असणे गरजेचे आहे.
तुमची शैक्षणिक पात्रता हा या संधीतला अडथळा ठरणार नाही. परंतु, जर तुम्ही पदवीधर असाल तर उत्तम. (M.A/ M. B. A/ Engineers ना प्राधान्य) उत्तम लेखक, वाचक असाल आणि बंगळूरू ऑफिसमध्ये काम करण्याची तयारी असेल तर या नोकरीची संधी घ्यावी. प्रतिलिपी, मो. ८८३०३६१३३९