हणजूणमध्ये ७ लाखांचे अमली पदार्थ जप्त

नायजेरियनला अटक : हणजूण पोलिसांची कारवाई

17th May 2018, 03:26 Hrsप्रतिनिधी। गाेवन वार्ता

म्हापसा : हणजूण पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईखाली नायजेरियन थाड्डेअस केलेची (३०) यास अटक केली. त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचा ७ लाखांचे अमल पदार्थ हस्तगत केले आहे.      

   गुमलवाडा हणजूण येथे अमली पदार्थाचा विक्री व्यवहार होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित आरोपीला पकडले. त्याच्याकडून ३ लाख ५ हजारांचे ६१ एलएसडी पेपर्स, ३ लाख २ हजारांचे ईक्स्टसी ८६ गोळ्या, ३८ हजारांचा एमफेटामाईन, २२ हजारांचा कॅटामाईन व ३० हजारांचा गांजा मिळून ७ लाखांचा अमली पदार्थ जप्त केला.              

पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक विश्वजित चोडणकर, विशाल मांद्रेकर,  शिपाई विशाल नाईक, अनंत च्यारी, तीर्थराज म्हामल, सत्येंद्र नास्नोडकर, रामा राऊत व प्रवीण पाटील या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी पुढील तपास हणजूण पोलिस करीत आहेत.