‘एटीएम’ मध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीला २८ लाखांना फसविले

वास्को पाेलिसांकडून कर्मचाऱ्याला अटक : सात दिवस पोलिस कोठडी


17th May 2018, 03:25 am
‘एटीएम’ मध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीला २८ लाखांना फसविले


प्रतिनिधी। गोवन वार्ता       

वास्को : एटीएम मशिनमध्ये पैसे भरणाऱ्याचे कंत्राट घेतलेल्या लॉजी कॅश सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला २८ लाख रुपयांना फसविल्या प्रकरणी वास्को पोलिसांनी शिवानंद मस्तोली ( २६) याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.       

मूळचे कर्नाटकचे पण कामानिमित्त मस्तोली कुटुंब ड्रायव्हर हिल येथे राहतात. शिवानंद हा लॉजी कॅश सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कामाला होता. बँकांच्या एटीएम मशिनमधील पैसे संपल्यावर त्यामध्ये पैसे भरण्याचे कंत्राट लॉजी कॅश सोल्युशन घेतले आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम शिवानंदला देण्यात आले होते. त्याने त्याचा गैरफायदा घेऊन एटीएममध्ये पैशांचा भरणा केलाच नाही. ही गोष्ट लॉजीकॅश सोल्युशन व्यवस्थापनाच्या नजरेस येताच त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडू शकला नाही. त्यामुळे लॉजी कॅश सोल्युशनतर्फे ३ मे रोजी वास्को पोलिसांत शिवानंद मस्तोली याच्या विरुध्द तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी त्याचा ड्रायव्हर हिल येथे शोध घेतल्यावर तो सापडू शकला नाही. त्यामुळे त्याच्या मोबाईल लोकेशनवर लक्ष केंद्रित करण्यात आले 

होते. 

मोबाईल लोकेशनवरून तो मेर्सीज वाडे येथे असल्याचा वास्को पोलिसांना सुगावा लागला. तो तेथे एका भाड्याच्या  खोलीत राहात असल्याचे समजताच वास्को पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्या खोलीची झडती घेतली असता,तेथे काहीच सापडले नाही. त्याने त्या रक्कमेची काय केले. ती रक्कम कोठे लपविली याचा शोध घेण्यासाठी उपअधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदशर्नाखाली पुढील तपास सुरू 

आहे. 

हेही वाचा