निकाल झाले, कवित्व उरले!

दक्षिणेतील इतर राज्यांत निवडणुका जिंकण्याचे नियोजन करताना भाजपच्या नेत्याना कर्नाटकमध्ये काय उणे पडले याचा आढावा घेऊन त्यानुसार व्यूहरचना करावी लागेल.

Story: अग्रलेख | 16th May 2018, 06:01 Hrs

उत्तरेत गेल्या चार वर्षांत व्यापक प्रमाणावर बाजी मारली असलीतरी दक्षिण दिग्विजय किती कठीण आहे याची प्रचिती कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्यानिकालाने भारतीय जनता पक्षाला मंगळवारी दिली. अर्थात नरेंद्र मोदी आणि अ​मित शहायांच्या आक्रमक प्रचाराने भाजपने कर्नाटक विधानसभेची निवडणूक जवळपास जिंकलीच.परंतु सत्तेच्या दारात पोहोचूनही बहुमताचा उंबरठा ओलांडता आला नाही. कर्नाटकनिर्विवाद जिंकला असता तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश,तेलंगण, केरळ या दक्षिणेकडील मोठ्याराज्यांकडे मोर्चा वळविणे भाजपला तुलनेने साेपे गेले असते. परंतु तसे स्पष्टपणानेव्हायचे नव्हते. ज्या प्रकारे निकाल लागले आहेत त्यावरून वेगवेगळ्या प्रकारचीअनुमाने काढता येतील. एक नक्की म्हणजे सिद्धरामय्या यांच्या काँग्रेस सरकारलापुन्हा सत्ता देण्यास कर्नाटकातील बहुसंख्य मतदारांनी नाकारले आहे. १२२ जागांवरून काँग्रेस७८ जागांवर उतरली असून दोन ठिकाणांहून उभे राहिलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या एकाजागी पराभूत झाले आहेत. राहूल आणि सोनिया गांधींपासून काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठनेत्यांनी हे राज्य राखण्यासाठी प्रचार केला होता. आता कर्नाटकही गमवावेलागल्यामुळे राहूल गांधीच्या नेतृत्वाच्या भवितव्याच्या चर्चेला नव्याने उधाणयेईल. दुसरे म्हणजे देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षाला मतदारांनीआहे तिथेच ठेवले आहे. खरे तर त्यांच्या दोन जागा कमीच केल्या आहेत. त्यामुळेत्रिशंकु विधानसभेचे जे काही फायदे मिळायचे ते मिळविण्यासाठी त्यांच्या हालचालीसुरू झाल्या आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या त्यांच्या हालचालींचे फलितयेत्या एक दोन दिवसांत समजू शकेल.

कर्नाटकमध्ये याआधी भाजपने सत्ता उपभोगली आहे. मात्र नंतरयेडियुरप्पा सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलीनझाली आणि भाजपला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे हे राज्य पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपनेआपली सारी ताकद पणाला लावली होती. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्षअमित शहा कोणतीही निवडणूक सहजपणे घेत नाही, जिंकण्यासाठी तेअथक मेहनत करतात हे गेल्या चार वर्षांत स्पष्टपणे दिसून आले आहे. पूर्ण जोमानेप्रचार करूनही भाजपला बहुमतापर्यंत पोहोचता आले नाही. तरी भाजपच्या या मर्यादितयशातही काही महत्वाचे मुद्दे आहेत, जे भविष्याच्यादृष्टीने पक्षनेत्यांना सुखावणारे ठरतील. कर्नाटकमधील निवडणुकीत भाजपला ग्रामीण भागांतजास्त यश मिळाले आहे. एरवी या पक्षाला शहरी भागांत प्रभाव असलेला पक्ष म्हटलेजाते. कर्नाटकसारख्या राज्यात भाजपने ग्रामीण मतदारसंघांत अधिक जागा मिळविल्या.इतर मागासवर्गीय आणि दलित मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतदान केले असेनिवडणूक विश्लेषकांनी दाखवून दिले आहे. अल्पसंख्याकांचे प्राबल्य असलेल्याभागांतूनही भाजपला चांगली मते मिळाली आहेत. याचा अर्थ गरीब आणि कमकुवत वर्गाची मतेभाजपला मिळाली आहेत. यामागे मोदी सरकारचे प्रयत्न कारणीभूत असू शकतील. मोफत एलपीजीकनेक्शन देणाऱ्या उज्ज्वला योजनेमुळे काही कोटी घरांत स्वयंपाक गॅस पोहोचला.स्वच्छ भारत योजनेअंतर्गत गरिबांच्या लाखो घरांत शौचालये बांधली गेली. बेटी बचाओबेटी पढाओ योजनेअंतर्गत मुलींना तसेच त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन सुरू झाले. जोडीलासुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींचे भविष्य आश्वासित होऊ लागले. आवास योजनेअंतर्गतगावांतून घरांची बांधकामे सुरू झाली. जनधन योजनेमुळे बँकिंगची माहिती नसलेल्याघरांतून बँक खात्याद्वारे व्यवहार सुरू झाले व योजनांचे लाभ थेट खात्यात येऊलागले. ग्राम ज्योती योजनेतून हजारो गावांतील लाखो घरांत विजेचे दिवे पेटले. पिकविमा योजनेचे लाभ थेट शेतकऱ्यांना मिळू लागले. कर्नाटकात ग्रामीण भागातील आणिगरिबांची मते भाजपला मिळण्यामागे या योजनांचे थेट मिळणारे लाभ हे कारण असू शकेल.
निवडणुकीचे निकाल लागले असले तरी ते स्पष्ट नसल्यामुळेनिकालानंतरचे कवित्व सुरू झाले आहे. सर्वांत मोठ्या पक्षाचे नेते म्हणूनयेडियुरप्पांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. तर काँग्रेसच्या पाठिंब्याने जनतादलाच्या कुमारस्वामींनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा सादर केला आहे. कोणालाही सरकारस्थापनेची संधी मिळाली तरी ते स्थिर राखण्याचे मोठे आव्हान असेल. तसेच दक्षिणेतीलइतर राज्यांत निवडणुका जिंकण्याचे नियोजन करताना भाजपच्या नेत्यांना कर्नाटकमध्येकाय उणे पडले याचाही आढावा घेऊन त्यानुसार व्यूहरचना करावी लागेल. तरच दक्षिणेतत्यांना आपले बस्तान बसविता येईल. 

Related news

आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर

आशेवर माणूस जगतो हे खरे असले तरी ठराविक मर्यादेनंतरही कृती घडून प्रश्न सुटत नाही असे दिसले तर संतापलेला माणूस होत्याचे नव्हते करू शकतो हे सत्ताधाऱ्यांनी विसरता कामा नये. Read more

बालसंगोपन आणि कथा-गोष्टीचं महत्त्व

पौराणिक एेतिहासिक घटना अाणि अापल्या अायुष्यात घडणाऱ्या घटना मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यास सहाय्यभूत ठरतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची अाहे. याची जाणीव पालकांनी ठेवली पाहिजे. Read more

सत्तेचा सोस आणि कमकुवत भाजपा

भाजपला मगोच्या तीन आमदारांशिवाय सत्ता टिकवणे कठीण होणार आहे. त्यामुळे मगो आणि भाजप यांच्यात खरोखरच मतभेद आहेत की हे सगळे ब्लॅकमेलिंगचे राजकारण आहे किंवा २०१७ सारखे दोन्ही पक्षांतील नेत्यांनी रचलेले हे नाटक आहे हे येत्या काही दिवसांत कळेल. Read more

Top News

कारवारजवळ बोट उलटून १५ भाविक समुद्रात बुडाले

उशिरापर्यंत सापडले ९ मृतदेह; ८ जण बचावले Read more

भंगारअड्डे स्थलांतरण ६ वर्षांपासून शीतपेटीतच

आयडीसीला मिळेना जमीन; द. गो. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवले आयडीसी संचालकांकडे बोट Read more

राज्याचे हिवाळी अधिवेशन तीन दिवसांचेच निश्चित

३० जानेवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार Read more

होय ! मुक्तीपेक्षा जनमत कौलच श्रेष्ठ

काळे बावटे दाखवाच; मंत्री विजय सरदेसाई यांचे गोवा सुरक्षा मंचाला आव्हान Read more

सत्तरीतून दर्जेदार साहित्याची निर्मिती

शिवाजी देसाई : गोमंतक मराठी भाषा परिषदेची साहित्यिक सहल Read more