अपराधीपणामुळेच म्हादईबाबत अमित शहांचे मौन

शिवसेना प्रवक्ता राखी प्रभुदेसाई नाईक यांचा आरोप

14th May 2018, 04:28 Hrs

कर्नाटक निवडणुकीत मतांच्या राजकारणासाठी म्हादई नदीचे पाणी  कर्नाटकाला देऊ करणारे भाजपाध्यक्ष अमित शहायांनी रविवारी गोव्यातील आपल्या भाषणात म्हादई संदर्भात एकही शब्द उच्चारली नाही, हे आश्चर्यकारकआहे. म्हादईचे पाणी वळवण्यास भाजपने परवानगी दिली तर गोव्यातील लोक रस्त्यावरउतरतील आणि भाजप आघाडीचे सरकार खाली खेचतील याची कल्पना भाजपला आहे. शहा यांच्याम्हादईवरील मौनाने त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना आहे हे दाखवून दिले आहे,अशी टीका शिवसेना प्रवक्ता राखी प्रभुदेसाई नाईक यांनीपत्रकाद्वारे दिली आहे.

या गंभीर विषयावर शहा यांनी आपल्यापक्षाची भूमिका जाहीर करायला हवी. राज्यात खाणी बंद झाल्यामुळे आर्थिक संकट ओढवलेआहे. लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असताना शहा यांनी याविषयावर जुजबी वक्तव्य करत न्यायालयामार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल,एवढे बोलून गोमंतकीयांचा अपमान केला आहे, असेही पत्रकात नमूदकरण्यात आले आहे. 

Related news

पत्नीचा खून, पतीला गोव्यात अटक

सादळगा पोलिस हद्दीतील प्रकरण, इचलकरंजी येथील दिनेश पाटील याला अटक Read more

हडफडे येथे मसाज पार्लरवर छापा

६ तरुणींची सुटका, तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई Read more

'अनैतिक' कृतीमुळे टॅक्सी परवाना निलंबित

टॅक्सी मालकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने राज्य वाहतूक प्राधिकरणाचा निर्णय Read more

Top News

मंजूर कायदे अद्यापही धूळ खात पडून !

राज्यातील वास्तव; उदासीन प्रशासनामुळे अनेक तरतुदी विनावापर Read more

सरकारकडून उच्च शिक्षण आर्थिक अनुदान योजना बंद

अवर सचिव दिवाण राणेंकडून अधिसूचना जारी Read more

केरळमध्ये अडकलेले गोवेकर सुखरूप

मांद्रेतील बारा जण आज गोव्यात  कुटुंबियांकडून समाधान Read more

म्हादईप्रश्नी कर्नाटक आता सर्वोच्च न्यायालयात

पाणी तंटा लवादाचा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत Read more