चैत्रमास

बालकविता


05th May 2018, 07:35 am
चैत्रमास

चैत्रमास
--
नवी पालवी होऊन आला,
चैत्र मास साजिरा
गर्द केशरी बंधूनी फेटा
गुलमोहर सजला
अंगभरी तो लेवूनी काटे
गुलाब जणू हसला
रंग आपुला दावित तो
हर्षभरे नटला
चाफा पिवळा घेऊनी आला
सुवास अंगभरा
वाटूनी जाता सारा परिसर
आनंदे भरला
प्राजक्ताची फुले सानुली
नाजूक रंगीत ईवली
अंगणात तो सडा शिंपिती
सुंदर रांगोळी परी
भ्रमर रुणुझुणू गातच येती
इकडे तिकडे घिरट्या घेती
फुलां फुलांतूनी हर्षे फिरती,
गाती वेड्यापरी
रंग लेवूनी ऋतू वसंत
हा सजला इंद्रापरी
पहा परिसर अहा
दिसतसे भासे इंद्रपुरी
- वसंत सावईकर
ढवळी मळ- फोंडा