खुलेआम दारू पिणाऱ्यांवर नियंत्रण आवश्यक

सुर्ला बाल ग्रामसभेत विविध विषयावंर चर्चा


25th April 2018, 04:42 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
डिचोली : डिचोली, सुर्ला पंचायतीची बाल ग्रामसभा मंगळवारी सायंकाळी पंचायत कार्यालयात घेण्यात आली. सरपंच भोलो खोडगिणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यता खुलेआम दारू पिणाऱ्यांवर पंचायत मंडळाचे नियंत्रण हवे असल्याची मते या ग्रामसभेत व्यक्त झाली.
यावेळी सरपंच भोलो खोडगिणकर, उपसरपंच विनिता घाडी, पंच प्रशांत गावकर, सुभाष फोंडेकर, सुरेखा खोडगिणकर, कृष्णा बायेकर, चंद्रकांत घाडी. उपस्थित होते. सुभाष फोंडेकर यांनी स्वागत केले. शैक्षणिक समस्या, कचरा नियोजन, शेतकी विषय, वाहतूक समस्या, टवाळखोर पोर, सरकारी योजना, अभ्यास सहज इत्यादी अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.
वनराज बेतकीकर, जयंती शेट वेरेकर, बाबलो नाटेकर इत्यादींनी या सभेत विविध समस्या पंचायत मंडळासमोर मांडले.

वाहनांची धूम स्टाईल धोकादायक

अल्पवयीन मुलांकडून वाहनांची धूम स्टाईल इतरांसाठी धोक्याची ठरत असून याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिस गस्त घालण्याची विनंती या मुलांनी ग्रामसभेत केली.