बारावीचा निकाल येत्या शनिवारी

एसएमएस, आयव्हीआरएसद्वारेही निकाल पाहण्याची सुविधा


25th April 2018, 01:03 am

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : गोवा शालान्त मंडळाने यंदा घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवार, २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे.       

शालान्त मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी या तारखेची घोषणा केली आहे. यंदा सुमारे १८,४०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. बारावीच्या निकालाबाबत गेले दोन दिवस खोट्या तारखा सोशल मीडियावरून फिरत होत्या; मात्र निकाल शनिवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येईल, असे सामंत यांनी मंगळवारी सांगितले.      

शालान्त मंडळाकडून शनिवारी सकाळी १० वाजता वेबसाईट्सवरूनही प्रसिद्ध होणार आहे. तसेच एसएमएस व आयव्हीआरएसद्वारेही आपला निकाल पाहण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.

www.schools9.com, www.examresults.net, www.examresults.net/goa, www.results.amarujala.com, www.knowyourresult.com, www.goa12.knowyourresult.com, www.indiaresults.com, www.exametc.com. या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध असेल.       

याशिवाय एसएमएसद्वारे GOA12<space>SEAT NUMBER – टाईप करून ५६२६३ क्रमांकावर, GOA12<space> सीट नंबर टाईप करून ५८८८८, GOA12<space>सीट नंबर टाईप करून ५६७६७५० व GB12<space>सीट नंबर टाईप करून ५४२४२ वर मेसेज केल्यास निकाल समजेल.