अनधिकृत बांधकामांच्या मुदतवाढीला मान्यता

मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर अध्यादेश


25th April 2018, 01:01 am

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : खासगी जमिनीतील अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी अर्ज मागविण्यासाठी एका महिन्याची मुदत वाढविण्याच्या प्रस्तावाला महसूलमंत्री रोहन खंवटे आणि महसूल सचिवांनी मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव आता मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येईल, त्यानंतर अध्यादेश जारी होईल.            

सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयीचा प्रस्ताव महसूल मंत्री व महसूल सचिवांनी मान्य केला आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी एक प्रस्तावही तयार केला आहे. त्यामुळे याच आठवड्यात मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन मुदत वाढवली जाईल.