गोवा डेअरीची घसरण!

अग्रलेख-२


25th April 2018, 06:02 am


राज्याच्या सहकार क्षेत्रातील एकमेव साखर कारखाना एका बाजूलारखडत सुरू असताना, दुसरीकडे राज्याची एकच म्हणता येईल अशीगोवा डेअरी वादंगामध्ये सापडली आहे. ज्यावेळी सहकारी तत्त्वावर एखादा व्यवसायकरायचे ठरते, त्यावेळी प्रामाणिक आणि निःस्वार्थीकार्यकर्त्यांचा गट त्यामागे असावा लागतो. सत्ताधारी मग ते कोणीही असोत, आपले वर्चस्व स्थापन करायचा, हस्तक्षेपाचीसंधी शोधायचा प्रयत्न करणारच, पण अशी संधी न लाभू देता संस्थेचीभरभराट कशी होईल यासाठी अध्यक्ष आणि संचालक मंडळाने कार्य करायला हवे. दूध उत्पादनकसे वाढेल यापासून अधिकाधिक संकलन करून राज्यातील नागरिकांना दर्जेदार दूध कसेपुरविता येईल याकडे अधिक लक्ष हवे. त्याऐवजी डेअरीत वाळवीप्रमाणे लागलेलीभ्रष्टाचाराची कीड अशी कशी फोफावली याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. संस्था पोखरूनआपले हित साधणारी एखादी व्यक्ती जरी सहकारी संस्थेत असली तरी ती संस्था डबघाईसयेते. अध्यक्षांनी व्यवस्थापकीय संचालकांवर आरोप करणे, त्यानंतरकाही संचालकांनी अध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल करणे, सत्यशोधनसमितीने चौकशीची मागणी करणे हा घटनाक्रम पाहिला की यामागे काहीतरी काळेबेरेअसल्याचा संशय बळावतो. शेतकऱ्यांना दुधासाठी चांगला भाव मिळावा, त्यांना दुग्ध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे हा मूळ उद्देशच बाजूलापडला आहे आणि प्रतिस्पर्धी संस्था आपले हातपाय पसरत चालली असताना गोवा डेअरीचीमात्र घसरण सुरू आहे, हे राज्यातील सहकार चळवळीचे दुर्दैवआहे.