समाजाने विज्ञानाप्रती कृतज्ञ राहावे

ज्ञान विज्ञान

Story: श्रीकांत शंभू नागवेकर |
25th April 2018, 06:01 am

एका नवश्रीमंत दांपत्याला अनेक वर्षांनी मल प्राप्ती झाली.अनेक उपाय करूनही अपयशच पदरात पडत गेलं. शेवटी आधुनिक विज्ञानाच्या कृत्रिम गर्भधारणेतूनसंतान प्राप्ती होण्यास यश मिळाले. त्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचा भलामोठासमारंभ आयोजित केला गेला होता. आपली मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल देव-देवतांचीकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुठले नवस-उपास केले गेले. कुठल्या देवस्थानांना भेटीदिल्या, याचे सविस्तर वर्णन करूनदेवावरील श्रध्दा भक्तीचे महत्त्व पटवून देण्यातयजमान मग्न होते. तसं पाहिलं तर इतकी वर्षे कित्येक नवस करूनही फलप्राप्ती झालीनव्हती. त्याचा यजमानांना सोयस्कर विसर पडलेला जाणवत होता.दुर्दैव एवढेच की ज्या विज्ञानामुळे हे यश प्राप्त झाले त्या विज्ञानाकडे कृतज्ञताव्यक्त करणारे दोन शब्द त्या दांपत्याच्या तोंडून आले नाहीत.

अनेकवेळा आम्ही असे प्रसंग अनुभवत असतो. एखाद्या इसमाला अकस्मात हॉर्ट अॅटकयेतो. त्याच्यावर ताबडतोबवैद्यकीय उपाय करून त्याला मृत्यूशय्येवरून उभा करण्यात डॉक्टरांच्या प्रयत्नांनायश मिळते. डॉक्टरांचे बिल फेडण्यापुरते आणि उपकाराचे दोनशब्द बोलण्यापुरते आपले कर्तव्य संपते. परंतु ज्या विज्ञानाने इसमाला जीवदान दिले,त्याविषयी थोडी कृतज्ञता व्यक्त करावी याची जाणीव कधी होत नसते.त्या उलट देव-देवतांचे उपकार समजून अनेक नवस-उपास, होम-यज्ञकरण्यावर भर दिला जातो. अशावेळी अनेकदा वैद्यकीय शास्त्राने घालून दिलेली बंधनेआणि सावधगिरीचे उपाय दुय्यम मानले जातात. हीच खरी शोकांतिका आहे.
विज्ञान ही आधुनिक जगाला लाभलेली मौल्यवान देणगी आहे. हजारोवर्षे जे मानवजातीला जमलं नाही ते केवळ ५०० वर्षांत विज्ञानाच्या बळावर मानवानेकरून दाखविले आहे. सर्व तर्‍हेच्या सुख सोयी निर्माण करून मानवाला यातनांपासून म
क्त केलं आहे.पृथ्वीवर स्वप्नांतला स्वर्ग आणला आहे. या विधानातील एकाही शब्दाला आक्षेपघेण्याचे धाडस या पृथ्वीतलावरील कुणी करू शकणार नाही. तरी आपला समाज विज्ञानाकडेप्रामाणिक का नाही ? विज्ञानाच्या यशाबाबतकृतज्ञता का दाखवत नाही? असे प्रश्न उपस्थित होतात.
त्या मागचं एक कारण असं असू शकते. समाजाने विज्ञानाला आपला सखामानून घेतलं आहे. मानवजातीला लाभलेला अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत विश्र्वासू असा मित्रआहे. तो आपली काम
व्यवस्थित करेल या विषयी खात्रीझालेली असते. अशा वेळी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रश्न येत नसावा.
लोक अत्यंत आधुनिक सुविधा असलेली आलिशान कार खरेदी करतात आणि तीदेवळात नेऊन तिच्यावर दैवी संस्कार करून घेतात. कार व्यवस्थित काम करील याची शाश्वतीविज्ञानाने दिलेली असते, तरीही लोक अशा दैवी क्रियेच्यामागे का लागतात ? तर कुठेतरी माणसाच्या डोक्यातनकारात्मकता वास करीत असते. काही तरी विघ्न घडू शकतं, याभयाच्या छायेत आपला समाज सतत वावरत असतो.
तसेच
जीवनातला अर्धा पेला भरलेला असला तरीअर्धा रिकामआहे ही न्यूनगंडाची भावना अधिक सतावत असते. अर्ध्या भरलेल्या पेल्यावर समाधान मानावंअसं कितीही आवर्जून सांगितलं गेलं तरी अर्ध्या रिकामीपणाचा,अर्थात नकारात्मकतेचा प्रभाव जास्त रहतो. हे आम्हीनाकारू शकत नाही. अशा भावनेतून समाज आजच्या विज्ञान युगातही देव-देवता,बाबा-बुवा, श्रद्धा-अंधश्रध्दा अशाजाळ्यांत गुरफटला जातो आणि त्यामुळे विज्ञानाविषयी कृतज्ञेची भावना राहून जाते,हे आपण समजून घेऊ.
परंतु, विज्ञानाच्या यशाला केवळ द्वेषभावनेतून विरोध केला जातो. वैज्ञानिक यशाचे श्रेय नाकारण्याचे प्रयत्न होतात हेखरे क्लेषकारक ठरते. अनेक वेळा खोट्या बातम्या किंवा माहिती पसरून विज्ञानालाआव्हान देण्याचे अयशस्वी प्रयत्न केले जातात.
काही दिवसा आधी एका खोदकामाच्या वेळी एक मूर्ती सापडली आणिमहत्त्वाचे म्हणजे एक नागराज त्या मूर्तीचं राखण करतो असा व्हि
डिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेचएका देवळाच्या तळ्यांत भव्य मोठी पाषाणाची मूर्ती पाण्यावर तरंगत राहते असा फोटोटाकला होता आणि शेवटी विज्ञान ह्या मागचे कारण स्पष्ट करू शकले नाही, ही टिपणी टाकलीहोती. म्हणजे दैवी चमत्काराचे समर्थन करण्याचा हा प्रयत्न असतो. हेच आजच्यासमाजाचे दुर्दैव होय.
विज्ञानाचे श्रेष्ठत्व नाकारण्याची ही केविलवाणी धडपड असते.विज्ञान अशा प्रसंगाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही, असा आरोपजेव्हा केला जातो. तेव्हा एका गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की अशा प्रसंगांचेशास्त्रीय पध्दतीने विश्लेक्षण केलं गेलं काय? विज्ञानसंशोधनाची विशिष्ट पद्धत असते. त्यानुसार चाचण्या पूर्ण केल्यानंतरच विज्ञान आपलानिर्णय देऊ शकतं. अशा तर्‍हेचे फसवेगिरीचे प्रसंग तयार करून किंवा अपूर्णमाहितीवरून विज्ञान हरले म्हणजे आपण जिंकलो अशा अहंभावातून आनंद घेण्याचे हेप्रयत्न असतात. दुसरा मुद्दा असा की जरी आजच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारेकोणत्याही प्रसंगाचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही तरी उद्या ते देऊ शकू, असा विश्र्वास विज्ञानाच्या प्रगतीवरून स्पष्ट झालेला आहे.
काही वर्षांपूर्वी मून हॉक्सम्हणून एक कॅसेट तयार केली होती. मोठ्या प्रमाणात तिचा प्रसार झालाहोता. आर्मस्ट्रॉन्ग व त्याचे सहकारी चंद्रावर पोहोचलेच नव्हते. नासाने एकास्टुडिओत तसा देखावा तयार करून
टीव्हीवर दाखविलाहोता असे अनेक आक्षेप घेतले गेले होते. शेवटी नासाच्या वरिष्ठांनी त्यांचे खंडनकरून खरी परिस्थिती लोकांसमोर आणली. तरी समाजातील भलामोठा वर्ग या फसव्या माहितीवरविश्र्वास ठेऊन राहिला.
समाजातील एक वर्ग लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेण्याच्याप्रयत्नात असतो. त्यात राजकीय पुढारी आपल्या स्वार्थाकरता त्याचा कसा फायदा घेता येईल,याचाच विचार करीत असतात.

स्वातंत्र्यकाळातीलविज्ञाननिष्ठ नेतृत्व आता नाहीसे होत आहे. हीच खरी दुर्दैवी बाब आहे.
आपल्या परंपरा कुठेतरी दुखावल्या जातात याचे शल्य समाजाच्या याघटकाला सतत बोचत असते. तसेच धार्मिक अहंकारामुळे आपण हरतो ही पराभवाची भावना अशा घटकालासतावत असते. हा पराभव विज्ञानामुळे पत्करावा लागत असल्यामुळे एका प्रकारेद्वेषभावना त्यांच्या मनात दडून राहते, त्यामुळेविज्ञानाला शह देण्याच्या प्रयत्नांत असे प्रयत्न होत असतात.
पण खंत एवढीच वाटते की समाजातील भला मोठा वर्ग ह्या अपप्रचारालाबळी पडतो. अज्ञानामुळे असावा अथवा शिक्षित वर्गातील विवेक बुद्धीच्या अभावामुळे असावा.त्यामुळे विज्ञानाकडे कृतज्ञता दाखविण्याचे औदार्य आम्ही विसरून जातो.