बारावीचा निकाल २८ रोजी

शालान्त मंडळाकडून तारखेची घोषणा


24th April 2018, 01:02 pm
बारावीचा निकाल २८ रोजी

विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता

पणजी: गोवा शालान्त मंडळाने यंदाघेतलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल शनिवार दि. २८ एप्रिल रोजीसकाळी १० वाजता जाहीर होणार आहे.

शालान्त मंडळाचे अध्यक्षरामकृष्ण सामंत यांनी या तारखेची घोषणा केली आहे. यंदा सुमारे १८४०० विद्यार्थीपरीक्षेला बसले होते. १२ वीच्या निकालाबाबत गेले दोन दिवस खोट्या तारखा सोशल मीडियावरून फिरतहोत्या,मात्र निकाल शनिवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येईल असे सामंत यांनी आज स्पष्ट केले.

शालान्त मंडळाकडून शनिवारीसकाळी १० वाजता वेबसाईट्सवरुनही निकाल प्रसिद्ध होणार आहे. तसेचएसएमएस व आयव्हीआरएसद्वारेही आपला निकाल पाहण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठीउपलब्ध असेल.

या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध असेल.

त्याशिवाय एसएमएसद्वारे GOA12<space>SEATNUMBER – टाईप करून 56263 क्रमांकावर,GOA12<space> सीट नंबर टाईप करून 58888,GOA12<space>सीट नंबर टाईप करून 5676750 GB12<space>सीट नंबर टाईप करून 54242वर मेसेज पाठवल्यास निकाल जाणून घेता येईल.

हेही वाचा