आशिष नेहराची निवृत्तीनंतर सुशेगाद 'गोवंदाजी'

पर्वरीत भाडेकरू म्हणून राहणार, स्थायिक होण्याचा मानस


23rd April 2018, 05:00 pm
आशिष नेहराची निवृत्तीनंतर सुशेगाद 'गोवंदाजी'

प्रतिनिधी- गोवन वार्ता

पणजी: आंतरराष्ट्रीयक्रिकेटमधून गेल्यावर्षी निवृत्ती घेतलेला भारतीय क्रिकेटसंघातील जलदगती गोलंदाज आशिष नेहरा याचा पर्वरी पोलिस स्थानकावरील फोटो सोमवारीसोशल मिडीयावरून व्हायरल झाल्यानंतर तो एक चर्चेचा विषय ठरला. या फोटोसंबंधी चौकशीकेली असता तो भाडेकरू म्हणून नोंदणी करण्यासाठी पर्वरी पोलिस स्थानकावर आला होता,अशी माहिती मिळाली. आशिष नेहरा आपल्या कुटुंबियांसोबत गोव्यात आला असूनतूर्त इथे स्थायिक होण्याचा त्याचा मानस आहे.

बॉलीवड कलाकारांसहमोठमोठे व्यवसायिक,उद्योजकांना गोव्यात आपले सेकंड होम असावे, असे वाटत असते. त्यातूनच अनेकांनी इथे फ्लॅट आणि बंगले विकत घेतलेआहेत. भारतीय संघाचा फलंदाज युवराज सिंग याने मोरजी येथे बंगला विकत घेतल्याचीबातमी काही काळापूर्वी उघड झाली होती. आता आशिष नेहरा हा देखील गोव्यात स्थायिकहोण्याची तयारी करीत आहे. तूर्त तो भाड्याच्या खोलीत राहणार आहे आणि म्हणूनचभाडेकरू म्हणून आपली नोंदणी करण्यासाठी सोमवारी त्याने पर्वरी पोलिस स्थानकातहजेरी लावली.

गेल्याच महिन्यात एका नलाईन संकेतस्थळालादिलेल्या मुलाखतीत आशिष नेहरा याने गोव्यात स्थायिक होण्याचा आपला इरादा स्पष्टकेला होता. निवृत्तीनंतर आपल्याला कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे आणि त्यासाठी आपणयोग्य जागेची निवड करीत होतो. दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळून तो मुंबईत स्थलांतरीतझाला परंतु तिथे मन रमेनासे झाल्याने त्याने गोव्याची निवड केली. गोव्यात येऊनपहिल्यांदा त्याने इथल्या परिस्थितीचा अभ्यास केला. गोव्यातील वातावरणा त्यालाभावले. इथली हिरवळ, समुद्र किनारेआणि विशेष म्हणजे प्रदूषण विरहीत वातावरण आवडल्याने त्याने आपला बेत पक्का केला.सर्वांत प्रथम आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी योग्य शाळा निवडण्याचे आव्हानहोते. मुलांच्या शाळेचा प्रश्न सुटल्यानंतर आपले मुख्य काम झाले,असे त्याने पत्रकाराकडे बोलताना म्हटले होते. गोव्याचे हवामान, हिरवळ, प्रदूषणरहित वातावरण आणि समुद्र किनारेहे निवृत्तीनंतर जगण्याचे एक योग्य ठिकाण आहे, असेआपल्याला वाटले आणि म्हणूनच आपण इथे येण्याचे ठरविले,असेतो म्हणाला होता.

मी एक साधा माणूस आहे. मला फक्त एक शॉर्टंस, एकटीशर्ट, स्लीपर्स, सनग्लासेस आणिमाझे कुटुंब सोबत हवे. मला हिरवळ पाहिल्याशिवाय