बिस्मार्कच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारास कुटुंबीय तयार

मंगळवारी रेडिओलॉजी अहवालानंतर न्यायालयाचा निवाडा शक्य


23rd April 2018, 04:05 pm
बिस्मार्कच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारास कुटुंबीय तयार

संशयास्पदरित्यामृत्यू झालेले बिस्मार्क डायस यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास त्यांचेकुटुंबीय तयार असल्याची माहिती त्यांचे बंधू मारियो डायस यांनी दिली आहे.मृतदेहावर पुन्हा शवचिकित्सा करणे शक्य नसल्याचा अहवाल तज्ञ डॉक्टरांच्या समितीनेदिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

बिस्मार्कयांच्या मृतदेहावर रेडिओलॉजी चाचणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल मंगळवारीन्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. यानंतर न्यायालय आपला निवाडा देण्याचीशक्यता आहे. दरम्यान, बिस्मार्क यांची हत्या झाल्याच्या दाव्यावर कुटुंबीय ठाम असून,आपला लढा ते यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

हेही वाचा