चोपडेत पकडले ४.८ लाखांचे ड्रग्स

अमलीपदार्थ विरोधी पथकाची कारवाई, चेन्नई येथील अश्रफ अकबर शरीफ याला अटक

16th April 2018, 04:03 Hrs


अमलीपदार्थविरोधी पथकाने चोपडे-शिवोली पुलाजवळ छापा टाकून ४.८ लाखांचे अमलीपदार्थ जप्त केले.चोपडे पुलाजवळ ड्रग्सची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती  मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक राहुल नाईकयांच्या मार्गदर्शानाखाली पथकाने सापळा रचून अश्रफ अकबर शरीफ (२५) या चेन्नई येथीलतरुणाला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ १.२ किलो चरस आढळून आला. पोलिसांनी अमलीपदार्थविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून, अश्रफ याला अटक केली.

दरम्यान, पोलिसउपनिरीक्षक रोहन नागेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरमल येथील अन्य एका छाप्यात ७० हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उल्हास रघुनाथ शेट्ये (६६, कोरगाव) याला अटक करण्यात आली आहे.

Related news

खाण प्रश्नी आमदारांना आणखी एक संधी

विधानसभेत ठराव संमत करण्याचे आश्वासन, गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचा मोर्चा लांबणीवर Read more

आयपीबीकडून ३८५ कोटी गुंतवणुकीचे ३ उद्योग मंजूर

दोन मरीनांचा घेणार फेरआढावा, एक खिडकी मंजुरी योजना मंजूर Read more