राय येथे विचित्र अपघातात तिघे जखमी

ट्रकमधील सामान बसवर आदळले, बसचालक गंभीर

16th April 2018, 03:40 Hrs

आंबोरा-राय येथे मालवाहू ट्रक कलंडून त्यातील सामान समोरून येणाऱ्या बसवर आदळल्याने झालेल्याविचित्र अपघातात तिघे जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले.

याविषयीमिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २.४५ वाजताहा प्रकार घडला. कागदाचे गठ्ठे घेऊन फोंड्याहून मडगावच्यादिशेने निघालेला ट्रक आंबोरा-राय येथे रस्ता दुभाजकाला आदळून रस्त्याच्या कडेलाकलंडला. यावेळी ट्रकमधील गठ्ठे समोरून येणाऱ्या बसच्या दर्शनी भागावर आदळले. यातबसचालक हरिष सिंग (३६) गंभीर जखमी झाला तर ट्रक चालक अभिमानबालनाथ मुरारी (२६) व क्लिनर बालाजी विश्वनाथ मुरारी (२४,महाराष्ट्र) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. मायणा-कुडतरीपोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे. 

Related news

खाण प्रश्नी आमदारांना आणखी एक संधी

विधानसभेत ठराव संमत करण्याचे आश्वासन, गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचा मोर्चा लांबणीवर Read more

आयपीबीकडून ३८५ कोटी गुंतवणुकीचे ३ उद्योग मंजूर

दोन मरीनांचा घेणार फेरआढावा, एक खिडकी मंजुरी योजना मंजूर Read more