कार्बन फॅक्टरीचे प्रदूषण रोखा

 नेसाय येथील सामाजिक न्याय मंचची मागणी

13th August 2017, 03:30 Hrs

प्रतिनिधी
गोवन वार्ता
मडगाव : नेसाय येथील एका बड्या कंपनीच्या कार्बन फॅक्टरीच्या प्रदूषणामुळे गावात प्रदूषण होत असून लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. सरकार व गोवा राज्य प्रदूषण मंडळाने कार्बन फॅक्टरीमुळे गावात पसरलेल्या प्रदूषणावर योग्य तोडगा काढून नेसायच्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक न्याय मंचाच्या अध्यक्ष आल्सिना फर्नांडिस यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
नेसाय भागात गेल्या ४० वर्षांपासून कार्बन फॅक्टरी सुरू असून लोकांना फॅक्टरीच्या प्रदूषणाचा त्रास होतो. सामाजिक न्याय मंचातर्फे स्थानिक पंचायत व आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांच्याशी संपर्क साधून गावात होणाऱ्या प्रदूषणावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. नंतर कार्बन फॅक्टरीच्या कंपनीच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून तोडगा काढण्याची कळकळीची विनंती केली.
अद्याप कोणीही गावातील लोकांना त्रासदायक प्रदूषणाची समस्या समजून घेतलेली नाही. त्यानंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे अधिकृत पत्रव्यवहार करून गावातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची मागणी फर्नांडिस यांनी केली.
यावेळी नेसायच्या सामाजिक न्याय मंचाचे उपाध्यक्ष सेबी फर्नांडीस, सचिव टेनी फर्नांडीस, एडवीन फर्नांडीस यांनी कार्बन फॅक्टरीच्या प्रदूषणामुळे लोकांना जडलेल्या आजाराची माहिती दिली. गावातील लोकही पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more