Update
   कोलवाळ येथे टाटा अेस गाडीला आग, ९० हजारांचे नुकसान   बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक

आरोग्यमंत्र्यांना पोटनिवडणुकीत पराभवाची धास्ती

 माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची टीका : मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन

13th August 2017, 03:27 Hrs
प्रतिनिधी
गोवन वार्ता
वाळपई : भारतीय घटनेने निवडून आलेल्या कोणत्याही आमदाराला आपल्या पक्षासाठी काम करण्याचा अधिकार आहे. यासाठी वाळपईतील भाजप उमेदवार विश्वजीत राणे यांना अजिबात वाईट वाटण्याची गरज नाही. यावरून विश्वजीत राणे यांना ही निवडणूक फार जड होणार असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे, अशी टीका फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी विश्वजीत राणे यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना सांगितले.
वाळपईत आयोजित पत्रकार परिषदेत रवी नाईक यांनी विकासा बाबतीत राणे हे निष्क्रिय बनले असल्याचा आरोप केला आहे. सत्तरीतील अनेक गावात आज रस्त्यांची वानवा आहे.
आपण या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आपण प्रचाराच्या माध्यमातून वाळपई मतदारसंघात फिरत असताना जनतेत राणे यांच्या बाबतीत प्रचंड चीड असल्याचे स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत मतदारांनी कोणतीही भीती अथवा दबाव न घेता निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन यावेळी रवी नाईक यांनी केले. वाळपईतील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून राॅय नाईक यांची निवड केली आहे. यामुळे आपण काँग्रेसचे आमदार म्हणून आपण वाळपईत प्रचार कार्यात सहभागी होत
आहे.
वाळपई काँग्रेस महिला अध्यक्ष रोशन देसाई यांनी यावेळी बोलताना वाळपईत पहिल्यांदाच चांगल्या दमाचा उमेदवार आपणास उपलब्ध झाला आहे. या उमेदवाराच्या माध्यमातून आपणास आपल्या समस्यांना वाचा फोडण्याची संधी मिळणार आहे. यासाठी​ रॉय नाईक यांना मोठ्या संख्येने निवडून आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वाळपई काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष आशिष काणेकर यांनीही विचार यावेळी
मांडले.

Related news

योगीराज कामत आज एसआयटीसमोर

प्रकृती अस्वाथ्यामुळे दिगंबर कामत चौकशीसाठी गैरहजर Read more

Top News

काणकोणात पाणी टंचाईची शक्यता

यंदा ८३ इंच पावसामुळे चापोली धरण जलाशयाची पातळी कमी Read more

दप्तरासंबंधी​ वास्कोत लवकरच बैठक

मुरगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांची माहिती : परिपत्रकाची माहिती देणार Read more

पुरावे नसल्याने अधिकारी दोषमुक्त

चावडी रुबी रेसिडन्सी प्रकरण Read more

योगीराज कामत आज एसआयटीसमोर

प्रकृती अस्वाथ्यामुळे दिगंबर कामत चौकशीसाठी गैरहजर Read more