पणजीत एकतर्फी लढत; कॉँग्रेस एकाकी

विजय सरदेसाई : पुढील निवडणुकीत फॉरवर्डचे आमदार वाढणार

13th August 2017, 03:23 Hrs
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : पणजी पोटनिवडणूक एकतर्फी होणार असून, कॉँग्रेस पक्ष एकाकी पडणार आहे. पणजीत काँग्रेससाठी जागा उरलेली नाही, हे अशोक नाईक यांनी माघार घेतल्यानंतर स्पष्ट झाले, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगर नियोजन, कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढील विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड २२ पेक्षा अधिक मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले. अशोक नाईक यांना कॉँग्रेसची उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला, परंतु नाईक समर्थकांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्यास मनाई केली. तसेच इतर कोणत्याही पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची​ सूचना केली. त्यामुळे पणजीत काँग्रेसची परिस्थिती काय आहे हे दिसून येते, असे सरदेसाई म्हणाले.
बाबूश यांचा गोवा फॉरवर्ड प्रवेश पणजीत भाजपला कसा फायदेशीर ठरणार असा प्रश्न पत्रकाराने केला असता, बाबूश यांचा फायदा भाजपला होण्याची गरज नाही. कारण बाबूश हे गोवा फॉरवर्डचे आहेत. बाबूश यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी कॉँग्रेसचे नेते मागच्या दाराने प्रयत्न करीत होते. परंतु गोवा फॉरवर्डने त्यांना सरळ मार्गाने पक्षात घेतले आहे. कॉँग्रेस नेत्यांनी कॉँग्रेस पक्ष त्यांच्याकडे घाण ठेवला होता, असा आरोप सरदेसाई यांनी केला. पत्रकाराच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना भाजपचे आम्हाला काही पडलेले नाही, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more