तड्यामुळे ‘लकी सेव्हन’ बुडण्याची भीती

 हटविण्यास अडथळे : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

13th August 2017, 03:22 Hrs
विशेष प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : मिरामार समुद्र किनाऱ्यावर रुतलेल्या लकी सेव्हन कॅसिनो जहाजाच्या तळाला तडा गेल्यामुळे ते हटविण्यास अडथळे येत आहेत. याच स्थितीत ते हलविल्यास बुडू शकते, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी सांगितले.
सरकार हे जहाज काढण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि लवकरच ते हटवले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. जहाजाला तडा गेल्यामुळे ते हटवण्यासाठी आता समुद्रात ओढले गेले, तर ते समुद्रात २०० ते ३०० किंवा ४०० मीटरवर बुडू शकते. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून आणि छिद्र बंद करूनच जहाज हटवले जाईल. या तांत्रिक गोष्टी असल्यामुळे वेळ लागेल, परंतु उशीर का होत आहे, ते बंदर कप्तान खात्याला विचारा, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जहाजाला छिद्र असल्याचा खुलासा केल्यामुळे ते जहाज भरतीच्या वेळी वाऱ्याच्या आणि लाटाच्या प्रवाहाने समुद्रात गेले, तर बुडण्याचीही शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे किनाऱ्यावर लागलेल्या या जहाजाला आता सुरक्षितरीत्या हटविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
राज्य सरकारला हे जहाज हटविण्यासाठी चिंता वाटत आहे. ते जर तसेच ओढले तर दुरुस्तीस नेण्यासाठी किमान १० ते १२ तास तरंगत राहण्याची क्षमता जहाजात हवी. सध्या तशी स्थिती नाही. दुरुस्तीसाठी हे जहाज मांडवीत ठेवले जाणार नाही, ते पुन्हा वास्कोला न्यावे, असे कंपनीला सांगितले जाईल असे त्यांनी सांगितले.

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more