म्युटेशन हरकतींसाठी १५ दिवसांची मुदत

ना हरकत प्रतिज्ञापत्र दिल्यास जमीन मालकास नोटीस पाठविण्याची गरज नाही

13th August 2017, 03:21 Hrs
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : सरकारने जमिनीची म्युटेशन नोंदणी प्रक्रिया कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार केला आहे. नवीन मसुदा नियम १० अॉगस्ट २०१७ रोजी अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला असून, नागरिकांना या मसुद्यासंबंधी सूचना, हरकती सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
जमीन मालकाने नोंदणी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहून म्युटेशन नोंदणीसाठी ना हरकत प्रतिज्ञापत्र दिल्यास जमीन मालकाला नोटीस पाठविण्याची गरज नाही, असेही यामध्ये म्हटले आहे.
सरकारच्या महसूल खात्याकडून मूळच्या गोवा जमीन महसूल (शहर सर्वेक्षण) नियमात दुरुस्ती करून नवीन नियमाचा समावेश करण्यात येणार आहे. म्युटेशनसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर तलाठ्याने त्याबाबतची नोंद करून संबंधितांना नोटीस पाठवून त्यांची म्युटेशनला काही हरकत असल्यात १५ दिवसांत कळविण्याची सूचना संबंधितांना करावी, असा नियम आहे. या नियमात आता बदल केला जाणार आहे. जमीन मालकाने संबंधित नोंदणी अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहून म्युटेशन नोंदणीसाठी ना हरकत प्रतिज्ञापत्र सादर केल्यास नोटीस पाठविण्याची गरज नाही, असा नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
राज्यात एखाद्या व्यक्तीने जमीन किंवा भूखंड खरेदी केल्यानंतर जमिनीच्या एक चौदाच्या उताऱ्यामध्ये नाव नोंदणीसाठी मामलेदार कार्यालयात अर्ज सादर केला जातो. राज्यात म्युटेशन प्रकरणाची संख्या भरपूर आहे. म्युटेशन प्रकरणे वेळीच निकालात काढण्याकडे लक्ष न दिल्याने विविध कारणास्तव ही प्रकरणे तुंबून पडली होती. म्युटेशन प्रक्रिया पू्र्ण करून घेण्यासाठी जमीन मालकांना मामलेदार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते.
म्युटेशन प्रकरणे जास्तीत जास्त ९० दिवसांत निकालात काढावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. या नवीन दुरुस्तीमुळे म्युटेशन प्रकरणे निकालात काढण्याची प्रक्रिया आणखी सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे.

Related news

पेडणेत कार्निव्हल सर्वधर्मसमभाव संस्कृती राखण्यासाठी

मंत्री आजगावकर यांचे प्रतिपादन : राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून कार्निव्हल विरोधी घोषणा Read more

प्रगत शेती - समृद्ध शेतकरी उद्दिष्ट अपूर्णच

सरकारकडून विशेष प्रयत्न : युवकांची नकारात्मक मानसिकता Read more

Top News

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more