‘मधमाशी पालन' शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवसाय

पी. शालियो यांचे मत : नेत्रावळीतील कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद


13th August 2017, 03:41 am
‘मधमाशी पालन' शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवसायप्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : आर्थिक विकासासाठी शेतीला पूरक असलेले जोडव्यवसाय सुरू करण्यास राज्यातील शेतकऱ्यांना वाव आहे. भौगोलिकदृष्ट्या वेगळेपण असलेल्या सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडा परिसरात मधमाशी पालन व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, असे मत मधमाशी पालन करणारे व्यावसायिक पी. शालियो यांनी व्यक्त केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था तसेच सांगे विभागीय कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रावळी येथे आयोजित ‘मधमाशी पालन' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेत सांगे, काणकोण, धारबांदोडा, केपे परिसरातील सुमारे शंभर शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगे विभागीय कृषी अधिकारी रघुनाथ मोरजकर, सहाय्यक अधिकारी गौरी प्रभुदेसाई, धारबांदोडा विभागीय कृषी अधिकारी शिवदास गावकर, नितीन बोरकर, मीलन गावकर, शाबा वेरेकर, उपसंचालक दिलीप परांजपे आदी उपस्थित होते. कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांचे शंकानिरसन केले.
मधमाशी पालनाकडे उत्तम व्यवसाय म्हणून बघा
सध्या मधाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. उत्तम आरोग्यासाठी सर्रास मधाचा वापर होतो तसेच विविध औषधांसाठीही मध वापरला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता एक उत्तम व्यवसाय म्हणून पहावे, असे आवाहन एस. आयकर यांनी केले.