मोपा विस्थापितांसाठी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू

१४ कुटुंबांना प्रत्येकी ८०० चौ.मी.जमीन


20th March 2018, 09:28 am
मोपा विस्थापितांसाठी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू

विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता 
पणजी: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेतील १४ विस्थापित कुटुंबांसाठी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू झाले. आज पर्यटन मंत्री बाबू आजगांवकर यांच्या उपस्थित प्रकल्पाची पायाभरणी झाली. 
मोपाच्या परिसरात १४ कुटुंबांना हटविण्यात आले होते ज्यांच्यासाठी सरकारने .८४ कोटी रुपये खर्च करून ३६८०० चौरस मीटर जमीन संपादीत केली होती. या जमिनीत घरे, गोठा कम्युनिटी हॉल यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाला ८०० चौरस मीटर जमीन घर, गोठ्यासाठी दिलेली आहे. सातेरी देवस्थानाकडून जमीन संपादीत करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विशेष प्रस्ताव मंजूर केला होता. 
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पर्यटन मंत्री बाबू आजगांवकर यांनी विस्थापितांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासकीय सोपस्कार लवकर पूर्ण व्हावेत यावर लक्ष दिले. 
मोपा विस्तापितांमध्ये धाकू वरक, चीमणी वरक, विठू वरक, सोनू विठू वरक, बाबलो वरक, सावित्री भागो वरक, गिता खरवत, सावित्री जानू वरक, जानी वरक, सांगू वरक, गंगाराम वरक, सोनू वरक, धाकू बाबू वरक पांडू वरक यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन होत आहे.