पियुष क्रिकेटर्सला क्रिकेटचे जेतेपद


20th March 2018, 03:53 am

वार्ताहर। गोवन वार्ता

हरमल :

येथील पियुष इलेव्हन, हरमल संघाने अायोजित केलेल्या गोवा, महाराष्ट्र, पंचायत व नगरपालिका क्षेत्र मर्यादित अाठ षटकांच्या टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेत अायोजक पियुष इलेव्हन संघाचा ४० धावांनी पराभव करून पियुष क्रिकेटर्स, अस्नोडा संघाने जेतेपदाचे १ लाख ११ हजार १११ रुपये व विजेतेपदाचा चषक पटकाविला.

उपविजेत्या संघाला ५५ हजार ५५५ रुपये व चषक, तसेच उपांत्य फेरीतील पराभूत संघ ध्रुव पार्से व नावेली क्रिकेटर्स संघांना प्रत्येकी ११ हजार १११ रुपये व चषक देण्यात अाले. वैयक्तिक गटात सामनावीर संदेश ठाकूर (अस्नोडा), उत्कृष्ट गोलंदाज युनीस (हरमल), उत्कृष्ट फलंदाज पुनाजी (अस्नोडा), मालिकावीर संदेश ठाकूर (अस्नोडा) तसेच नीतेश गडेकर (षटकार सर्वाधिक), विशाल वायंगणकर (सर्वाधिक बळी), सुधीर ठाकूर (उत्कृष्ट झेल), युनीस (उपांत्य सामन्यात बळी) अादींना ‘वेदांत’तर्फे बक्षिसे पुरस्कृत केली होती. बक्षीस वितरण समारंभास माजी मंत्री दयानंद मांद्रेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच अनंत गडेकर, उद्याेजक जीत अारोलकर, सचिन परब, उपसरपंच मनीषा कोरकणकर, पंच प्रतीक्षा नाईक, मनोहर केरकर, समाज कार्यकर्ते राघू गावडे, कृष्ण परब, शिवोलीच्या सविता गोवेकर, बाबू नार्वेकर, अभिषेक कुडव, क्लबचे अध्यक्ष तथा पंच प्रवीण वायंगणकर उपस्थित होते.पियुष वेदांत, भानुदास, कुणाल, लक्ष्य, साई, अादींनी मान्यवरांना तर प्रवीण यांनी प्रमुख पाहुणे माजी मंत्री मांद्रेकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रवीण वायंगणकर यांनी स्वागत केले तर तुषार नाईक यांनी सूत्रसंचालन केले.