अोस्सयच्या गजरात कुंकळ्ळी दुमदुमली

चित्ररथ स्पर्धेत शांतादुर्गा प्रतिष्ठान, रोमटामेळात कुडचडे शिमगोत्सव प्रथम


20th March 2018, 06:07 am

वार्ताहर। गोवन वार्ता
कुंकळ्ळी : कुंकळ्ळी शिमगोत्सव समिती व गोवा पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने अायोजित चित्ररथ स्पर्धेत शांतादुर्गा महादेव प्रतिष्ठान, कवळे, फोंडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक अाडपई युवक संघ, तर तिसरे स्थान कुंभारजुवा नागरिक समितीला प्राप्त झाले.
रोमटामेळ स्पर्धेत कुडचडे-काकोडा शिमगोत्सव समितीस प्रथम, मंडलेश्वर माणागुरू शिमगोत्सव समितीस द्वितीय, तर बोरी शिमगोत्सव समितीस तृतीय क्रमांक प्राप्त झाला. उत्तेजनार्थ बक्षीस सावर्डे शिमगोत्सव मंडळ व पाईकदेव शिमगोत्सव मंडळास प्राप्त झाले.
कुंकळ्ळी कदंब बसस्थानकाजवळ अायोजित या शिमगोत्सव कार्यक्रमास यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अामदार क्लाफासियो डायस, कुंकळ्ळी पालिकेच्या नगराध्यक्षा पाॅलिता कार्नेरो, समिती अध्यक्ष राजन नाईक, नगरसेवक विदेश देसाई, प्रेमदीप देसाई, उपनगराध्यक्ष शशांक देसाई, समाजसेवक संतोष देसाई, सुदेश भिसे, माजी नगरसेवक नागेश चितारी, मुख्याधिकारी शंकर गावकर, मारियो मोराईस व सचिव मंगलदास प्रभू उपस्थित होते.
शिमगोत्सव मिरवणुकीची सुरुवात नारळ वाढवून भिंवसा येथून करण्यात अाली. यावेळी चित्ररथ स्पर्धेत कुंकळ्ळी पालिकेने कचरा निर्मूलन विषयावरील पहिल्यांदाच चित्ररथ सादर करून रसिकांची वाहव्वा मिळवली.
लोकनृत्य स्पर्धेत सरस्वती कला मंडळ, फोंडा यांना प्रथम, सावईवेरेच्या सख्याहारीला द्वितीय, कमलावती रवळनाथ मंडळाला तृतीय, पाॅली टॅलेन्ट ग्रुपला चौथे, तर घरवई पुरुष कला मंडळाला पाचवे बक्षीस प्राप्त झाले.
वेशभूषा कनिष्ठ : प्रथम कन्या नाईक, द्वितीय सान्वी गुरव, तृतीय चित्रा रायकर यांना बक्षीस प्राप्त झाले. वेशभूषा वरिष्ठ : प्रथम सर्वज्ञा पाटील, द्वितीय प्रमोद मोर्लेकर, तृतीय रोहित नाईक यांना बक्षीस प्राप्त झाले.