खाणअवलंबितांचे आंदोलनः ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

आंदोलनकर्त्यांच्या हल्ल्यात ५ पोलिस जखमी, ३ आंदोलनकर्ते इस्पितळात


19th March 2018, 02:02 pm
खाणअवलंबितांचे आंदोलनः ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

खाण अवलंबितांच्याआंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाला जबाबदार असलेल्या ११ जणांविरोधात पणजी पोलिसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायदंडाधिकारी विजयलक्ष्मी शिवोलकर यांनीदाखल केलेल्या तक्रारीनुसार कारवाई करताना पणजी पोलिसांनी ८ आंदोलनकर्त्यांना अटककेली तर तिघे जखमी इस्पितळात उपचार घेत आहेत. सरकारी मालमत्तेची नासधूस, सरकारीकर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे, महामार्ग रोखल्याप्रकरणी हे गुन्हे नोंदवण्यातआले आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांना जामीन मिळवून देण्यासाठी खाण भागातील आमदार नीलेश काब्राल, दीपक पावसकर, प्रसाद गावकर पोलिस स्थानकावरसंध्याकाळी उशिरापर्यंत ठाण मांडून होते.

खाणबंदीच्यासर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारकडून कोणतीच अपेक्षित कृती नझाल्याने खाण अवलंबितांनी सोमवारी पुकारलेल्या आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागले.आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या मंत्री-आमदारांच्या विनंतीला झुगारूनआंदोलनकर्त्यांनी पणजीतील क्रांती सर्कलजवळील वाहतूक रोखून वाहनचालक, नागरिक तसेचपर्यटकांनाही वेठीस धरले. मंत्री-आमदारांनी विनंती करूनही मार्ग मोकळा करण्यासत्यांनी नकार दिला. उलट मध्यस्तीसाठी आलेले लोकप्रतिनिधी तसेच सुरक्षेसाठी तैनातपोलिसांना धक्काबुक्की, बाटल्या व दगडफेक करण्यात आली. आंदोलनकर्ते अधिक आक्रमकबनत असल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल लाठीमार करण्यास सुरुवात केली. यावेळीआंदोलनकर्त्यांनी सरकारी वाहनांची नासधूस केली. अग्निशामक दलाच्या वाहनाची मोडतोड,जवानाला मारहाण तसेच पोलिस वाहनाच्या दर्शनी भागावर तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळीकदंबच्या ४ तर कर्नाटक परिवहनाच्या २ गाड्यांची नासधूस करण्यात आली.

यावेळी दोन्हीगटात संघर्ष उफाळल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांचा पाठलाग करून त्यांनाआंदोलनस्थळावरून पिटाळून लावले व रोखून धरलेली वाहतूक मोकळी केली. काहींनी पणजीबसस्थानक परिसरातील दुकांनामध्ये आसरा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकाने बंदकरून आंदोलनकर्त्यांना आश्रय न देण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

दरम्यान,दोन्ही गटात उडालेल्या संघर्षावेळी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या दिशेने बाटलीफेकण्यात आली. तर, आमदार नीलेश काब्राल किरकोळ जखमी झाले. याशिवाय, काही पत्रकार वपर्यटकही जखमी झाले. 

हेही वाचा