कळंगुटमध्ये सेक्स रॅकेट, तिघांना अटक

रिट्झ गाडी जप्त, दिल्लीतील तरुणीची सुटका

12th August 2017, 08:39 Hrs

कळंगुट परिसरात चालणाऱ्या वेश्याव्यवसायाविरोधात धडक मोहीम उघडलेल्या कळंगुट पोलिसांनी शनिवारी सापळा रचून तिघांना अटक केली. पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शानाखालील पथकाने बिगर सरकारी संस्थेच्या साह्याने मूळ दिल्ली येथील तरुणीची सुटका केली.
कळंगुट येथे तरुणीला घेऊन आलेल्या दलालांना पोलिसांनी व्यवहार सुरू असतानाच ताब्यात घेतले. यावेळी रिट्झ गाडी क्र. जीए ०३ पी ९५४१ तसेच ५४ हजार रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी सुशिलकुमार साहू (मुंबई), वीरू व संतोषकुमार सिंग (दिल्ली) यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Related news

महम्मदचा मृत्यू उंचावरून पडल्याने

कुटुंबाकडून घातपाताचा संशय व्यक्त, पोलिस तपासात अपघाताचा निष्कर्ष Read more

एफपीपीसीए शुल्क भरण्यास ६ महिने मुदत

सहा हफ्त्यांमध्ये दंडाशिवाय रक्कम भरण्याची मुभा Read more

Top News

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more