पणजीत काँग्रेसला स्थान नाहीः सरदेसाई

बाबूश मोन्सेरात यांच्या प्रवेशामुळे गोवा फॉरवर्ड बळकट

12th August 2017, 06:52 Hrs

पणजी पोटनिवडणूक एकतर्फी होणार असून कॉँग्रेस पक्ष एकाकी पडणार आहे. पणजीत काँग्रेससाठी जागा उरलेली नाही हे अशोक नाईक यांनी माघार घेतल्यानंतर स्पष्ट होते, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बाबूश यांचा गोवा फॉरवर्ड प्रवेश पणजीत भाजपला फायदेशीर ठरणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, बाबूश यांचा फायदा भाजपला होण्याची गरज नाही. कारण बाबूश हे गोवा फॉरवर्डचे आहेत. बाबूश यांच्यामुळेच काँग्रेसला २ जादा आमदार मिळाले होते, ते गोवा फॉरवर्डला मिळणार का, असे विचारले असता, राजकारणात दोन अधिक दोन २२ सुद्धा होऊ शकतात, असे उत्तर त्यांनी दिले. 

भाजपच्या अंतर्गत व्यवहारांशी गोवा फॉरवर्डला देणेघेणे नाही, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

Related news

महम्मदचा मृत्यू उंचावरून पडल्याने

कुटुंबाकडून घातपाताचा संशय व्यक्त, पोलिस तपासात अपघाताचा निष्कर्ष Read more

एफपीपीसीए शुल्क भरण्यास ६ महिने मुदत

सहा हफ्त्यांमध्ये दंडाशिवाय रक्कम भरण्याची मुभा Read more

Top News

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more