डॉ. बिरादर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

म्हापसा न्यायालयात धाव


18th March 2018, 02:35 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

म्हापसा : एमबीबीएस नसताना आंगोद-म्हापसा येथे बेकायदेशीरपणे  वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या हनुमंतराय बिरादर यांनी अटक होण्याची शक्यता असल्याने म्हापसा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.      

म्हापसा येथील अतिरिक्त  जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे. भारतीय वैद्यकीय मंडळाच्या बोगस नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय प्रॅक्टिस करीत असल्याची तक्रार केल्यानंतर १२ मार्च रोजी म्हापसा पोलिसांनी त्याच्या दवाखान्यावर छापा टाकला होता. त्या वेळेपासून बिरादर पोलिस अटक चुकवत आहेत. पोलिस त्याच्या पर्वरी येथील निवासस्थानी गेले असता ते सापडू शकले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेला घराचा पत्ता चुकीचा असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

गोवा वैद्यकीय मंडळाचे रजिस्ट्रार गोविंद नास्नोडकर यांनी बिरादर जामा मशिद, आंगोद-म्हापसा येथे दवाखाना थाटून बेकायदेशीरपणे प्रॅक्टिस करीत असल्याची तक्रार म्हापसा पोलिसांत केली होती. त्यांच्याविरुद्ध गोवा वैद्यकीय मंडळ कायदा-२००५, तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ४६५, ४६८ व ४२० खाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.      

हेही वाचा