‘गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’


14th March 2018, 03:53 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : गोवा नेतृत्त्वहीन बनले असून त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.       

सरकारचा भाग असलेले गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी राज्यात आणीबाणी सदृश स्थिती असल्याचे म्हणत गोव्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे वैद्यकीय उपचारानिमित्त सध्या अमेरिकेत असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत राज्य नेतृत्त्वहीन बनले आहे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच पर्याय आहे, असे शिवसेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा प्रवक्त्या राखी नाईक यांनी म्हटले आहे.      

१६ मार्चपासून खाणी बंद होणार असल्याने कामगार, ट्रकमालक, बार्जवाले सर्व संकटात आहेत. त्यांना खोटी आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे. पर्रीकर यांनी स्थापन केलेल्या तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार गटाकडून या प्रश्नावर तोडग्याची अपेक्षा करता येणार नाही. पर्रीकरांच्या अनुपस्थितीत भाजप नेत्यांवर लोक अवलंबून राहू शकत नाहीत, कारण हे नेते तेवढे कार्यक्षमही नाहीत, असे  नाईक यांनी म्हटले आहे.       

हेही वाचा