तुये इस्पितळाची आरोग्य मंत्र्यांकडून पाहणी

14th March 2018, 03:53 Hrs

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पेडणे : तुये येथील बांधण्यात येणारे इस्पितळ हे गोवा राज्यातील सुसज्ज असे ​इस्पितळ होणार असून या इस्पितळाच्या कामासाठी सुमारे ७० कोटी रुपये खर्च होणार आहे. हे इस्पितळ एक वर्षात पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी तुये येथे सुरू असलेल्या इस्पितळाच्या भेटी दरम्यान सांगितले.      

तुये इस्पितळाचा फायदा पेडणे तालुक्यातील लोकांसाठी होणार आहे. या इस्पितळाच्या कामासाठी मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी अापल्याला विनंती करून कामाचा आढावा घेण्यासाठी भेट द्या, असे सांगितले होते. त्यानुसार आपण कामाचा आढावा घेण्यासाठी आल्याचे राणे यांनी सांगितले.      

यावेळी आरोग्यमंत्री राणे यांच्यासोबत मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे उपस्थित होते. तसेच बांधकाम कंपनीचे प्रकल्प अधिकारी प्रशांत बुले, प्रकल्प अधिकारी संतोष पुजारी, आरोग्य खात्याच्या अधिकारी डॉ. सुरेखा परुळेकर, डॉ. राजनंदा देसाई, डॉ. जुझे डिसा, डॉ. धुमे, तुये आरोग्य निरीक्षक उदय ताम्हणकर आदी उपस्थित होते.      

यावेळी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इस्पितळाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आरोग्यमंत्री राणे, आमदार सोपटे तसेच इतर अधिकारी यांनी भेट देवून कामाची पाहणी केली व बांधकाम कंपनीला विविध सूचना केल्या. गेल्या काही महिन्यांपासून हे बांधकाम मंद गतीने सुरू असल्याचे सोपटे यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यापुढे तीन महिन्यानंतर बांधकाम कामाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.       

आर्थिक गोष्टीसाठी सध्या हे काम मंद गतीने असून किमान वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा आमचा मनोदय असल्याचे सांगून आर्थिक बाबी संबंधी लवकरच प्रयत्न करून हे काम पुढे नेण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या या इस्पितळाच्या इमारतीला भेट दिल्यानंतर तुये सामुदायिक केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा परुळेकर, डॉ. राजनंदा देसाई, डॉ. जुझे डिसा, डॉ. धुमे तसेच आरोग्य निरीक्षक उदय ताम्हणकर यांच्यासोबत तुये केंद्राच्या समस्या तसेच याठिकाणी असलेल्या डॉक्टर्सची कमतरता याची माहिती आमदार दयानंद सोपटे यांनी बैठकीत दिली. 

मांद्रे मतदारसंघातील ११ उपआरोग्य केंद्र व तिथे असलेल्या समस्या सोपटे यांनी मंत्र्यांसमोर मांडल्या. तसेच तुये सामाजिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्सची कमतरता असून त्या जागा भराव्यात, अशी मागणी केली. यावेळी समस्या सोडविण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आमदार सोपटे यांना दिले.   

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

‘केवायसी’ पूर्ततेसाठीच पैसे काढण्यावर निर्बंध

टपाल खात्याकडून ट्वीट संदेशाद्वारे स्पष्टीकरण Read more