फुटबॉल विकास मंडळाच्या मूल्यमापन कृतिसत्राचा समारोप

गोवा फुटबॉल विकास मंडळाने खोर्ली येथील मोनफोर्ट मैदानावरील आपल्या केंद्रात उत्तर व दक्षिण गोव्यातील मिळून आपल्या १०० फुटबॉल प्रशिक्षकांचे मूल्यमापन कृतिसत्र गेल्या आठवड्यात आयोजित केले होते.


12th August 2017, 03:55 am

पणजी : गोवा फुटबॉल विकास मंडळाने खोर्ली येथील मोनफोर्ट मैदानावरील आपल्या केंद्रात उत्तर व दक्षिण गोव्यातील मिळून आपल्या १०० फुटबॉल प्रशिक्षकांचे मूल्यमापन कृतिसत्र गेल्या आठवड्यात आयोजित केले होते. मंडळाचे तांत्रिक प्रमुक डॅरेल डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली हे कृतिसत्र आयोजित करण्यात आले होते.
एआयएफएफ व एफसीतर्फे प्रशिक्षण परवाना अभ्यासक्रम घेण्यात येणार असून त्यासाठीची तयारी म्हणून या कृतिसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात सैद्धांतिक व व्यावहारिक सत्र तसेच ब्रेन स्टोर्मिंग सत्राचा समावेश करण्यात आला होता.
या कृतिसत्रात बहुतेक सर्व फुटबॉल प्रशिक्षक सहभागी झाल्याबद्दल फुटबॉल विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रुफीन मोन्तेरो यांनी समाधान व्यक्त केले आहे. एआयएफएफ व एफसीतर्फे प्रशिक्षण परवाना अभ्यासक्रमासाठी तयार रहाण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव आलेक्सियो डिकॉस्ता यांनी कृतिसत्राच्या समारोप सोहळ्या प्रसंगी वेळी केले. मूल्यमापनासाठी कृतिसत्रात अवलंबण्यात आलेल्या निकषांची माहिती डॅरेल डिसोझा यांनी दिली.
या कृतिसत्रामुळे सहभागी प्रशिक्षणार्थींना पुढील प्रशिक्षण सत्रातील सहभाग सोपा होणार आहे.