लोकशिक्षण हायस्कूल धारगळचे सुयश

क्रीडा खात्यातर्फे घेण्यात आलेल्या पेडणे आणि जिल्हा पातळीवर मर्यादित शालेय ज्युदो स्पर्धेत धारगळ येथील लोकशिक्षण हायस्कूलने भरघोस यश मिळविले.


12th August 2017, 03:54 am

वार्ताहर
गोवन वार्ता
धारगळ : क्रीडा खात्यातर्फे घेण्यात आलेल्या पेडणे आणि जिल्हा पातळीवर मर्यादित शालेय ज्युदो स्पर्धेत धारगळ येथील लोकशिक्षण हायस्कूलने भरघोस यश मिळविले.
पेडे - म्हापसा येथील क्रीडा संकुलात झालेल्या स्पर्धेत लोकशिक्षण विद्यालयाच्या खेळाडूंनी सतरा वर्षाखालील मुली आणि मुलांच्या गटाने बक्षिसे प्राप्त करून यश संपादन केले.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात - ७१ किलो वजन गट - शुभम चव्हाण (सुवर्ण पदक), शिवा पार्सेकर (सुवर्ण पदक), स्वप्नील सरमळकर ६५ किलो (सुवर्ण पदक), दिनेश वरक ४५ किलो (सुवर्ण पदक), विकास राठोड ४५ किलो (रौप्य पदक).
१७ वर्षांखालील मुलींच्या ४० किलो वजन गटात - शेजल सावंत (रौप्य पदक) ५२ किलो वजन गटात पूजा ठाकूर (सुवर्ण पदक). जिल्हा पातळीवर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ७१ किलो शुभम चव्हाण (सुवर्ण पदक), शिवा पार्सेकर (कांस्य पदक) व ४५ किलो वजन गटात दिनेश वरक (रौप्य पदक) तसेच मुलींच्या गटात १७ वर्षांखालील ५२ किलो वजन गटात पूजा ठाकूर हिने कांस्य पदक पटकावले.
शुभम चव्हाण, दिनेश वरक, शिवा पार्सेकर, पूजा ठाकूर या चारही विद्यार्थ्यांची दि. १२ ऑगस्ट रोजी कांपाल पणजी येथे होणार असलेल्या राज्य ज्युदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक विशांत आर्लेकर आणि क्रीडा शिक्षक किशोर किनळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन
केले.
मुलांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष विकास प्रभुदेसाई, व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, सचिव सोमनाथ बांदोडकर, उपाध्यक्ष गोपाळ राऊळ, संस्थेचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष दीपक कोलवाळकर व पालकवर्ग यांच्याकडून अभिनंदन
करण्यात येत आहे.