भावकी फ्रेंड्सतर्फे कॅरम स्पर्धेचे आयोजन

भावकी फ्रेंड्स स्पाेर्टस् आणि कल्चरल क्लबतर्फे पहिल्या अखिल गोवा एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

12th August 2017, 03:54 Hrs

पणजी : भावकी फ्रेंड्स स्पाेर्टस् आणि कल्चरल क्लबतर्फे पहिल्या अखिल गोवा एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रामप्रकाश मंदिर, भावकी मये, डिचोली येथे आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु. ५ हजार व चषक, द्वितीय रु. ३ हजार व चषक आणि तृतीय उपांत्य फेरीतील पराभूत प्रत्येकाला १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी आंतर मये पंचायत स्पर्धा खेळवण्यात येईल, दि. १३ ऑगस्ट रोजी डिचोली तालुका मर्यादित स्पर्धा होईल तर दि. १५ ऑगस्ट रोजी अखिल गोवा पातळीवरील स्पर्धा होईल. स्पर्धेचे प्रवेश शुल्क २०० रुपये आकारण्यात येईल.
अधिक माहिती व स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी महादेव (९७६४८८५१२२) किंवा सुबोध (९९२३१३४८०८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.