कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल

23rd February 2018, 11:07 Hrs

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजीः टोंक-करंझाळेयेथील कॉर्पोरेशन बँकेत बनावट सोने तारण ठेवून ३१.२३ लाखांचे कर्ज घेणाऱ्या दीपालीव रविराज सिंग घेलडा (करंझाळे) या दाम्पत्यासह  सोन्याच्या दागिन्यांची पारख करून किंमतठरवणाऱ्या सोनाराविरोधात पणजी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पणजी पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कॉर्पोरेशन बँकेच्या क्षेत्रिय अधिकारी एस.अन्नपूर्णा यांनी तक्रार दाखल केली होती. ३१ डिसेंबर २०१४ ते २७ मे २०१५ याकालावधीत वरील संशयितांनी सोने तारण ठेवून बँकेच्या टोंक-करंझाळे शाखेतून कर्जघेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीला अनुसरून पणजी पोलिसांनीवरील दाम्पत्यासह सोनाराविरोधात भादंसं कलम ४२० व ४०६ खाली गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखालीमहिला पोलिस उपनिरीक्षक विभावरी गावकर पुढील तपास करत आहेत.