अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी

23rd February 2018, 09:19 Hrs

वेर्णा पोलिसस्थानकातील महिला पोलिस शिपाई अर्शला पार्सेकर हिच्या आत्महत्येला जबाबदार पोलिसउपनिरीक्षकावर कारवाई करून न्याय देण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी पत्रकारपरिषदेत केली. त्या पोलिस उपनिरीक्षकाने अर्शलाला लग्नाचे आमिष दाखवले होते, असादावा कुटुंबियांतर्फे करण्यात आला.

आत्महत्याकरण्यापूर्वी काही दिवास आधी अर्शला त्या पोलिस उपनिरीक्षकाच्या संपर्कात होती.तसेच, त्यानंतरही त्यांचे मोबाईलद्वारे चॅटिंग सुरूच होते, असा दावा अर्शलाच्याबहिणीने यावेळी केला.

दरम्यान, अर्शलाचाफोन लॉक झालेला असल्याने त्याद्वारे ठोस माहिती पुढे आलेली नाही. सदर फोन फोरेन्सिकचाचणीसाठी पाठवण्यात आला असून, त्यानंतर अधिक माहिती मिळणार असल्याची माहिती पोलिससूत्रांनी दिली आहे. 

Top News

चारशे पदांना सरकारची मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समितीचा निर्णय Read more

खाण प्रश्नाबाबतची बैठक लांबणीवर

अवलंबितांत निराशा; आमदारांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा Read more

आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी

पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. Read more

राज्यातील सर्व खाणी सुरक्षित

पावसाळ्यातील खाण सुरक्षेचा सचिवांकडून आढावा Read more